इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारची राजधानी पाटणाच्या शेजारील बाढ या गावात एका प्रियकराने नाराज प्रेयसीचा रुसवा काढणे महागात पडले. प्रेयसीची समजूत काढण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला, परंतु तो त्याच्यासाठी तो महागात पडला. जेवण केल्यानंतर युवकाने आपल्या खोलीत जाऊन प्रेयसीला समजवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा विनवण्या करूनही तिची समजूत काढू न शकल्याने युवकाने आत्महत्येची धमकी दिली.
व्हिडिओ कॉलदरम्यान त्याने फाशीचा फास आपल्या गळ्यात टाकला. हे पाहून प्रेयसीची नाराजी दूर होईल अशी त्याची आशा होती, परंतु असे झाली नाही. अचानक प्रियकराचा हात मोबाईलवरून सुटला, तो पकडण्यासाठी त्याने टेबलवरून उडी मारली. उडी मारताच त्याच्या गळ्यावरील फास आवळला गेला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बाढ उपविभागाच्या अथमलगोला पोलिस ठाणे हद्दीतील रूपस येथे घडली.
दररोजप्रमाणे प्रियकर जेवण करून आपल्या खोलीत गेला. घरातील इतर सदस्य आपापल्या खोलीत झोपायला गेले. खोलीत गेल्यानंतर प्रियकराने प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून तिचा रुसवा दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रेयसी न पटल्याने त्याने आमहत्या करण्याची धमकी देत गळ्यात फास अडकवला. जवळपास एक तास हा तमाशा सुरूच होता. लाइव्ह व्हिडिओदरम्यान त्याने फाशी लावण्याची धमकी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियकराच्या हातातून अचानक मोबाईल सुटला. तो पकडण्यासाठी त्याने टेबलवरून उडी मारली. उडी मारताच गळ्यातील फास आवळला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. लाइव्ह व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेयसीने शेजारी फोन करून प्रियकराने फाशी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धावत जाऊन युवकाच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नागरिकांनी खिडकीतून पाहिले तेव्हा युवक फास घेतलेल्या स्थितीत आढळला. हे संपूर्ण प्रकरण प्रेम प्रकरणाशी संबंधित असून, सर्व पैलूंचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.