जम्मू – लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. नेहमीच स्वच्छंद बागडणारी ही फुले सध्या थोडी हिरमुसून गेलेली आहेत. सगळी बंधने तोडून ते आपल्या भावविश्वात नेहमीच रममाण होत असतात. परंतु कोरोनारूपी राक्षसाने या मुलांचा जणू आनंदच हिरावून घेतला आहे.
बंदीकाळात या कोवळ्या मुलांवर खूपच बंधने घालावी लागत आहेत. कुठे म्हणून जायची सोय राहिलेली नाही. या सगळ्या जाचाला वैतागून शेवटी जम्मू-काश्मीरमधील एका चिमुकलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लाडिक तक्रार केली आहे. आम्हा मुलांवर अभ्यासाचा इतके ओझे का टाकता, अशा वैतागलेल्या स्वरात चिमुकलीने व्हिडिओतून साद घातली आहे.
व्हिडिओत चिमुकलीने म्हणते, मी सहा वर्षांची आहे. ऑनलाइन शाळेत लहान मुलांवर अभ्यासाचे खूपच ओझे आहे. लहान मुलांना शाळेचे जास्त काम देतात असे का? भल्या पहाटे उठून सहा वाजता शाळेत बसावे लागते.
हा व्हिडिओ खूपच व्हायरला झाला आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. मुलीच्या भावूक आवाहाने त्यांच्याही हृदयाला पाझर फुटले. शाळेतील विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला ४८ तासांत नवीन धोरण बनविण्याचे आदेश मनोज सिन्हा यांनी एक ट्विट करून दिले.
मुलीचा व्हिडिओ
व्हिडिओ क्लिपमध्ये चिमुकली म्हणते, मी सहा वर्षांची आहे. लहान मुलांना सर आणि मॅडम जास्त अभ्यास का देतात. इतका अभ्यास मोठ्या मुलांना दिला जातो. जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा १० वाजेपासून दोन वाजेपर्यंत क्लास सुरू असतात. एक इंग्रजीचा क्लास, एक गणिताचा आणि नंतर ऊर्दूचा क्लास. त्यानंतर कॉम्प्युटरचा क्लास असतो. इतका जास्त अभ्यास मोठ्या मुलांचा असतो. लहान मुलांना इतके काम का दिले जाते मोदी साहेब…
बघा या मुलीचा व्हिडिओ
Modi saab ko is baat par zaroor gaur farmana chahiye? pic.twitter.com/uFjvFGUisI
— SrinagarGirl (@SrinagarGirl) May 29, 2021