इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड जणू काही त्यांचे ओळखपत्र बनलेले आहे, त्याचे अनेक फायदे आहेत परंतु त्याचा आणखी एक फायदा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका मुलीने सांगितला ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. दोन वर्षांपूर्वी हरवलेल्या एका मुलीची आधार कार्डमुळे तिच्या कुटुंबासोबत पुन्हा भेट झाली. मुलीनं संपूर्ण किस्सा पंतप्रधान मोदी यांना सांगितला.
डिजिटल इंडियामुळे भारतीयांचे जीवन सुखकर झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये डिजिटल इंडिया वीक कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी या कार्यक्रमातील एक घटना समोर आला आहे. एका हरवलेल्या मुलीची दोन वर्षांनंतर आधार कार्डमुळे तिच्या कुटुंबासोबत भेट झाली. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्यावर तेथे उपस्थित एका मुलीने तिची कहानी सांगितली. मुलीनं सांगितले की, हरवल्यानंतर आधारकार्ड मुळेच दोन वर्षांनंतर तिची घरवापसी शक्य झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, देशातील सुमारे 1 अब्ज लोकांकडे आधार कार्ड आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८३ टक्के लोकांकडे त्यांचे खास ओळखपत्र आहे. सरकारने आधार कार्ड धारकांसाठी अनेक सेवा आणि सुविधा जाहीर केल्या आहेत, ते कुठेही बंधनकारक करण्यात आलेले नसले तरी, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही सहज काही काम करू शकता आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
आधार कार्डचे अनेक फायदे आहेत, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही घरबसल्या प्रॉपर्टीचे व्यवहार करू शकता. म्हणजेच आधार कार्ड धारकांसाठी मालमत्तेचे व्यवहार पेपरलेस, कॅशलेस आणि ह्युमन लेस झाले आहेत. तुम्हाला फक्त तुमचे बँक खाते, आधार आणि बायोमेट्रिक तपशील द्यावे लागतील.
जर तुम्ही आधार कार्डधारक असाल तर तुम्ही ई-हॉस्पिटल सेवा घेऊ शकता. यासाठी सरकारी रुग्णालये आणि मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकता. महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्हाला सरकार किंवा UGC कडून कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल. शिक्षणासाठी चालवल्या जाणार्या सर्व योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.
गांधीनगर येथे आयोजित डिजिटल इंडिया वीक कार्यक्रमात एका मुलीने पंतप्रधानांना तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. तिनं सांगितलं की, हरवल्यामुळे कुटुंबापासून दोन वर्ष अनाथ आश्रमामध्ये राहिल्यानंतर आधारकार्डमुळे तिची पुन्हा तिच्या कुटुंबासोबत भेट झाली. कारण आईसोबत नातेवाईकांकडे जात असताना रेल्वे स्टेशनवर ती हरवली. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने तिला अनाथ आश्रमामध्ये नेले.
ती दोन वर्ष अनाथ आश्रमात राहिली. त्यानंतर तिच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी आधार कार्ड अधिकारी आश्रमात बनवण्यासाठी आल्यावर तिची खरी ओळख पटली. आधार कार्ड अधिकाऱ्यांनी पूर्ण तपास करून याची माहिती अनाथ आश्रम प्रशासनाला दिली. त्यानंतर अनाथ आश्रमाने मुलीच्या कुटुंबियांनी शोधण्यात मदत केली. यामुळे मुलीची दोन वर्षानंतर पुन्हा तिच्या घरी परतली.
Girl Return back to home after 2 years due to Aadhar card