इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रियकर प्रेयसी यांचे प्रेमाचे नाते आगळे वेगळे असते, परंतु त्यामध्ये दुरावा निर्माण झाला तर त्यातून वाईट घटना देखील घडू शकतात, अशाच प्रकारची घटना ऑस्ट्रेलियात घडली. परंतु एका प्रियकराने प्रेयसीला चक्क जिवंत काढून टाकले ,परंतु तो तरुण त्या देशातील नसून भारतातील पंजाबमधील रहिवासी होता, या प्रकरणी त्याला कोर्टाने सुमारे २३ वर्षाची शिक्षा करताना सुनावली आहे. दरम्यान, पंजाबमधील बलाला गावात राहणाऱ्या आरोपीच्या आई-वडिलांना त्याला शिक्षा झाल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे.
ब्रेकअपमुळे बदला बदला
पंजाबमधील बलाला गावातील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या तारिकजोत सिंग हा तरूण २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे जाऊन स्थायिक झाला होता. तिथे त्याची ओळख जसमीन कौर हिच्याशी झाली होती. त्यांचे काही दिवस प्रेम प्रकरण सुरू होते, मात्र त्यानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले होते. मात्र हे ब्रेकअप तारिकजोत याचा संताप झाला होता. त्यामुळे त्याने माजी प्रेयसी जसमीन कौर हिचे ५ मार्च २०२१ रोजी अपहरण केले होते, त्यानंतर तो तिला कारच्या डिक्कीमध्ये घालून अॅडलेडपासून सुमारे ६५० किमी दूर दक्षिण ऑस्ट्रेलियात घेऊन गेला होता. त्यानंतर एका दफनभूमीत त्याने तिला जिवंत गाडले होते. भयानक वाईट गोष्ट म्हणजे ब्रेकअप झाल्याचा बदला घेण्यासाठी त्याने जसमीत कौर हिचा गळा कापल्यानंतर तिला जिवंत गाडले.
त्याने सगळं कबूल केला
खरे म्हणजे जिवंत गाडल्यानंतरही जसमीतचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर दोन -तीन दिवसानीं तिचा जेव्हा मृत्यू झाला. तेव्हा तिला तिच्या आसपास काय घडत आहे, याची तिला जाणीव होती. या बाबत सरकारी वकील यांनी कोर्टात सांगितले की, जसमीत कौर हिचा मृत्यू खूपच वेदनादायी होता. तिने पूर्ण शुद्धीमध्ये मृत्यूच्या वेदना सहन केल्या होत्या. दरम्यान, आरोपी तारिकजोत याने गुन्हा कबूल केला होता. आता या प्रकरणामध्ये कोर्टाने आरोपीला २२ वर्षे आणि १० महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. सदर घटना ऑस्ट्रेलियात घडली असली तरी तेथील कोर्टाने भारतीय वंशाच्या या तरुणाला अशा प्रकारे कठोर शिक्षा सुनावली आहे. २२ वर्षांच्या शिक्षेनंतर त्याला २०४४ मध्ये पहिला पॅरोल मिळेल. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्वरित त्याला देश सोडावा लागेल. तोपर्यंत तरी त्याला ऑस्ट्रेलियातील तुरुंगातच मुक्काम मुक्काम करावा लागेल.