इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली असून कृत्रिम गर्भधारणा करून आई बनणे देखील शक्य असल्याचे म्हटले जाते. ह्यातच सरोगसी मदर म्हणजेच जैविक आई आणि कायदेशीर आई असे प्रकार देखील आढळून येतात. परदेशात यामुळे बालकाचा हक्क नेमका कुणाकडे? असे वाद मोठ्या प्रमाणावर होतात, त्यातूनच मग गुन्हेगारी प्रकार देखील घडून येतात. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असाच एक प्रकार घडला त्यात छोट्या बालिकेचे अपहरण करून तिच्या जैविक पालकांनी तिला तळ घरात लपून ठेवले होते, परंतु अखेर पोलिसांनी या बालिकेचा शोध घेतला असून तिला तिच्या कायदेशीर पालकांकडे सोपविले आहे.
न्यूयॉर्कमध्ये तिच्याच जैविक आई-वडिलांनी चार वर्षांच्या मुलीचे अपहरण केले आणि तिला दोन वर्षे घरात लपवून ठेवण्यात यश मिळवले आणि आता ही मुलगी 6 वर्षांची झाली आहे. 2019 सालापासून हरवलेली मुलगी न्यूयॉर्कमधील हडसन येथील तिच्या घराच्या पायऱ्यांखाली लपलेली आढळली होती. जवळपास दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी घरातील जिन्याखाली बांधलेल्या एका खास खोलीत सापडली. या बाळाची तब्येत चांगली आहे. मुलीचे तिच्या जैविक पालकांनी अपहरण केल्याचे समजते. न्यूयॉर्क राज्य पोलिसांनी सांगितले की त्यांनी एका सहा वर्षांच्या पॅस्ले शुल्टिस नामक मुलीला सागर्टिस शहरातील एका घराच्या पायऱ्यांखाली बांधलेल्या चेंबरमधून (तळघरातून) बाहेर काढले. सदर मुलगी सुखरूप आहे. पेस्लेचे त्याचे जैविक पालक किम्बर्ले कूपर आणि कर्क शल्टिस यांनी अपहरण केले होते असे मानले जाते. या दोघांनाही मुलाला सोबत ठेवण्याचा कायदेशीर अधिकार नाही.
सन 2019 मध्ये त्या मुलीला ताब्यात देण्यास नकार दिल्यानंतरच पेस्लेचे त्याच्या जैविक पालकांनी अपहरण केले होते. अपहरणानंतर पेस्लेला घरातील एका तळघरातील गुप्त खोलीत ठेवण्यात आले होते, ती खोली अतिशय लहान, थंड आणि ओलसर होती. दरम्यान, पोलिसांनी आणखी सांगितले की, त्यांना या मुलीबाबत सुगावा लागला. सर्च वॉरंट घेऊन घराची झडती घेतली असताना पोलिसांनी तपासासाठी विशेष प्रकारचे साधन वापरले गेले होते, तेथे अनेक लाकडी पायऱ्या काढण्यासाठी यंत्र योग्य होते. छोट्या जेसीबीच्या आणि हातोडीच्या मदतीने तासाभराच्या प्रयत्नानंतर बांधकाम तोडल्यावर त्यांना पायऱ्यांखाली छोटे-छोटे ठसे दिसले. त्यांनी लगेच कोपऱ्यात शोध घेतला आणि मुलगी आणि तिची ३३ वर्षीय जैविक आई सापडली. पोलिसांनी मुलीच्या जैविक आई-वडिलांना आणि आजोबांना अटक करून मुलीला तिच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यात दिले.