कोलकाता (पश्चिम बंगाल) – संताप तथा राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हटले जाते, रागाच्या भरात कोण काय करेल? याचा काही भरवसा नसतो. रागामध्ये आपल्या प्रिय किंवा जवळच्या व्यक्तीला देखील मनुष्य काहीही करू शकतो. त्यातून एखादी विपरीत घटना देखील करु शकते याचा प्रत्यय नुकताच पश्चिम बंगाल मध्ये आला. एकमेकावर अत्यंत जिवाभावाने अत्यंत प्रेम करणारे प्रियकर आणि प्रेयसी गेल्या चार वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. एक दिवस प्रेयसीने आपल्या प्रियकराला मिठी मारली, त्याचा किसही घेतले, त्यानंतर त्याच्या सोबत सिगरेट देखील ओढली आणि नंतर काय झाले? तर त्याच्यावर चक्क गोळीच झाडली!
आपला विश्वास बसला नाही ना! होय, असेच घडले होते. परंतु बिचार तो तरुण थोडक्यात बचावला अन्यथा तो जिवानिशी गेला असता. कारण प्रेयसीला वाटू लागले की, तिचा प्रियकर तिच्यापासून जात असून आपले अंतर वाढत आहे, तेव्हा तरूणीने तिच्या प्रियकरावर गोळ्या झाडल्या. ही घटना पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील केसिया गावात घडली आहे. हे २२ वर्षीय तरुण आणि २२ वर्षीय तरुणी गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
रागाच्या प्रेयसीने मारलेली गोळी प्रियकराच्या पोटाला लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. ही तरूण मुलगी नुकतीच झारखंडमधील तिच्या घरातून परतली होती. ती काही महिन्यांपूर्वी तेथे नोकरीसाठी गेली होती.
गोळ्या झाडून महिलेने तेथून पळ काढला होता , यानंतर पोलिसांनी महिलेला शोधून अटक केली आणि तिच्या ताब्यातून एक बंदूकही जप्त केली. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील अंतर वाढले होते, त्यामुळेच महिलेने प्रियकरावर गोळी झाडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.