नाशिक – नाशिकचे माजी पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामाबाबत टीका केली. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्याबाबत सरकारचे उदासीन धोरण आहे. संपूर्ण जिल्ह्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पीएम केअर फंडामधून दिलेले व्हेंटिलेटरही सुरू केलेले नाहीत, तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता नाही. राज्यात अतिशय वाईट परिस्थिती आहे. हे राज्यसरकारचं अपयश आहे. या सरकारमध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळे समुद्रात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे या सरकारची अवस्था असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाजन म्हणाले की, कोरोनाच्या माध्यमातून काहींनी ब्लॅक मार्केटिंगची संधी साधलीय, खासगी रुग्णालयं रुग्णांची लूट करतायत, महापालिकेच्या माध्यमातून रुग्णांची लूट करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहे. कोरोना उपाययोजनांबाबत नाशकात गोंधळाचं वातावरण आहे. नाशिकमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा, गरजेपेक्षा ५० टक्केचं ऑक्सिजन मिळतोय. रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला आहे. पण, वजनदार मंत्र्यांच्या मतदारसंघात रेमडेसिविर मुबलक पुरवठा होतो असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महापालिकेनं ८ हजार रेमडेसिविर उपलब्ध केलेत, ऑक्सिजन पुरवठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध केल्याचेही सांगितले.
आम्ही राजकारण बाजूला ठेवून जे जे करता येणं शक्य आहे, ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. उद्या शिष्टमंडळ घेऊन मुंबईला जातोय, उत्तर महाराष्ट्रावर अन्याय होतो आहे. उद्या संबंधित मंत्र्यांची भेट घेऊ, गरज पडल्यास राज्यपालांची भेट घेऊ असेही त्यांनी सांगितले. फक्त ठाणे, पुण्यालाचं औषधं दिली जात आहे. त्यामुळे वेळप्रसंगी कोर्टात जाण्याचीही आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांनाही लवकर भेटत नाही, आम्हाला कधी भेटणार ? असा प्रश्नही उपस्थितीत केला.इतक्या आणीबाणीच्या परिस्थितीतही राज्यसरकार सर्वांना विश्वासात घेत नाही, विरोधी पक्षांना भेटत नाहीराज्यसरकारला विरोधी पक्षाची गरज वाटत नाही. नाशिक रुग्णसंख्या जास्त असूनही रेमडेसिविर, ऑक्सिजन, औषधांचा सर्वात जास्त तुटवडा. पालकमंत्री म्हणतात मी हतबल आहे, याला काय म्हणावं ? असेही त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमधील ४ तास दुकानं सुरू ठेवण्याची अट अतिशय धोकादायक, दिवसभरातील गर्दी लोकं फक्त या ३-४ तासात करत असल्याचेही ते म्हणाले.