नशिक – मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असलेल्या व्यक्तीने एका शाळकरी मुलाशी कसं बोलायला हवं ? असे सांगत नाशिकचे माजी पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्हायरल अॅाडिओ क्लीपवर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असेही सांगितले. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंचा इलाज मलाच करावा लागेल असेही ते म्हणाले.
दोन दिवसापूर्वीच खडसे व शाळकरी मुलांच्या संवादाची आॅडिओ क्लीप व्हायरल झाली. त्यात खडसे यांनी गिरीश फक्त मुलींचेच फोन उचलतो असे सांगितले. त्यामुळे त्याला महाजन यांनी चोख प्रत्युत्तर देत समाचार घेतला. यावेळी त्यांनी थेट खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगितले.