नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे होणार आहे.
या समारंभासाठी सर्वांनी वेळेपूर्वी २० मिनिटे अगोदर उपस्थित राहावे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केले आहे.