मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – गिरणा धरणातील मासेमारीचा ठेका मुंबईच्या ठेकेदाराला देण्यात आल्यानंतर स्थानिक मच्छिमारांना मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक मच्छीमारांना धमकावत खोटे गुन्हे दाखल केले जात असल्यामुळे मालेगाव तालुक्यातील गिरणा धरण मच्छीमारांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी रात्री अपरात्री घराची झडती घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे भविष्यात मोठी घटना होण्याची शक्यता लक्षात घेता मच्छिमार बांधवांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत अप्पर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. मत्सविभाग महामंडळ व जिल्हाधिकारी यांच्या बरोबरच चर्चा करुन या प्रकरणावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील गिरणा धरणात अनेक वर्षांपासून मालेगाव तालुक्यातील मच्छीमार बांधव मासेमारी करुन आला उदर निर्वाह करीत आहे.