नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणारा २५ वा गिरणा गौरव पुरस्कार मविप्रचे सरचिटणीस व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व यशवंतराव चव्हाण केंद्र नाशिक विभागीय अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांना जाहीर झाला आहे. त्याच बरोबर डॉ.रविंद्र कोल्हे (जेष्ठ समाजसेवक अमरावती), मंगेश हाडवळ,(दिग्दर्शक, पुणे), कौशल इनामदार,(संगीतकार मुंबई), राजेश पाटील (पिंपरी चिंचवड आयुक्त), सचिन कुमावत (अहिराणी भाषा समृध्दक गायक-गीतकार जळगाव), प्रवीण जोशी (साने गुरुजी शिक्षण एज्युकेशन, नाशिक), इंजि. बाळासाहेब मगर (नाशिक कवी अध्यक्ष- साहित्यिक), शिवाजी दहिते पाटील (धुळे), विजयकुमार मिठे (जेष्ठ ग्रामीण साहित्यिक, दिंडोरी), स्वाती भामरे (नाशिक), प्राचार्य डॉ.सुभाष भालेराव (येवला), सुवर्णा जगताप (आशिया खंड व भारतातील पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला चेअरमन, लासलगाव), यांचा समावेश आहे. पुरस्कार्थींची निवड समिती सदस्य प्रकाश होळकर, दिलीप पाटील, राजेंद्र निकम, प्रा.डाॅ.शंकर बोराडे, रविंद्र मालूंजकर, शिवाजी जाधव, प्रल्हाद ठाकरे, संजय फतनानी यांनी केली.