अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सुरू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने गिरणा धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. आज संध्याकाळी पाण्याची आवक पाहून धरणाचे ६ दरवाजे १ फुटाने पुन्हा उघडण्यात आले असून धरणातून ७१२८ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.