नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गिरणा धरणातून रब्बी हंगामातील २०२२-२३ चे पाहिले सिंचना करता आवर्तन सोडण्यात आले आहे. धरणाच्या एका दरवाजातून १००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पत्रात होत असल्याने नदी काठचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आवर्तनामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेतक-यांना फायदा होणार आहे. या पावसाळ्यात गिरणा धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर हे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.