अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. अनेक शासकीय इमारतींना तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरणावर सुद्धा सर्वत्र तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. तर पाण्याचा विसर्ग होत असलेल्या वक्र दरवाज्यावर आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आल्याने धरणाचा परिसर रोषणाईने उजळून निघाला आहे. सध्या धरणाच्या दरवाज्या मधून गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.