अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणा-या गिरणा धरणातील पाण्याचा साठा जवळपास ९२ टक्क्यांवर पोहचल्याने आणि पुढील काहीच दिवस पावसाची शक्यता लक्षात घेता धरणाचे काल दोन दरवाजे उघडण्यात आले होते. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने आज सकाळी सात वाजता धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडण्यात आल्याने सध्य स्थितीतील चारही दरवाजे एक फुटांनी उघडण्यात येऊन धरणातून सध्या ४७५२ क्युसेस पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात होऊ लागला आहे. धरणात येणा-या पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असून नदी काठच्या नागरीकांनी सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.