इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – कधीकाळी मुलगी नको, असे म्हणणाऱ्या या समाजात आज मुलीचे हक्काचे, मानाचे स्थान आणि अस्तित्व आहे. वंशाच्या दिव्यापेक्षा पणती बरी अशी भावना समाजात रूढ होत आहे. जगभरातील मुलींचे शिक्षण, संरक्षण आणि बालविवाह याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी ‘इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड’ साजरा केला जातो. तरीही अनेक ठिकाणी आजही मुलींना दुय्यम मानले जाते. अशा परिस्थितीत मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी सरकारी पातळीवर काही आर्थिक योजना राबविण्यात आल्या आहेत. मुलींसाठी शासनाच्या विविध योजना देखील आहेत.
सुकन्या समृद्धी योजना
मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने ‘सुकन्या समृद्धी’ ही योजना सुरू केली आहे. तुम्ही जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावाने बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या खाते उघडू शकता. यामध्ये वर्षाला किमान १००० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या योजनेवर सरकार सध्या ७.६ टक्के व्याज देत आहे. मुलीची २१ वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम तुम्हाला मिळेल.
चिल्ड्रन गिफ्ट म्युच्युअल फंड खास मुलींसाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये गुंतवलेले पैसे डेट आणि इक्विटी या दोन्ही पर्यायांमध्ये जातात. याचा लॉक-इन कालावधी १८ वर्षांचा आहे. यामुळे मोठी रक्कम आपल्या गाठीशी राहते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही पोस्ट ऑफिसची एक विशेष योजना आहे, जी मुलींसाठी राबविली जाते. सरकार सध्या NSC वर ७.६ टक्के वार्षिक व्याज देत आहे. यामध्ये किमान १००० रुपये गुंतवू शकतात, तर कमाल मर्यादा नाही. त्याचा कार्यकाळ ५ वर्षांचा आहे. यात तुम्हाला आयकरात सूट देखील उपलब्ध आहे. पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असलेली ही योजना मुलींसाठी खूप खास मानली जाते. हे खाते देशात कुठेही हस्तांतरित केले जाऊ शकते. यावरही चांगले व्याज मिळते.
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) हा मुलींसाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. यात आयुर्विम्याचे संरक्षण आहे. पालकांचे निधन झाल्यास, विमा कंपनी हफ्ता देखील भरते. याशिवाय, विमा कंपनी पालकांच्या अनुपस्थितीत मुलीच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलते आणि तिला एकरकमी रक्कम देखील देते. म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे मुलींसाठी मोठा निधी तयार केला जाऊ शकतो. बँकेत एसआयपी खाते उघडल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीचे पैसे इक्विटी, डेट आणि मिक्स्ड फंड्समध्ये गुंतवले जातात, जे भविष्यात मोठा निधी तयार करण्यास मदत करतात.
पोस्ट आरडी आणि बरेच काही
याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट (आरडी) उघडून तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. ही रक्कम पाच वर्षांनी मिळेल. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत सुरक्षित आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते देखील उघडू शकता. याची म्यॅच्योरिटी १५ वर्षांची आहे, जी ५ वर्षांनी वाढविली जाऊ शकते. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते उघडून दरमहा किमान ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. वार्षिक करता येणारी कमाल गुंतवणूक १.५ लाख रुपये आहे, ज्यावर ७.१० टक्के व्याज उपलब्ध आहे.
सोने
प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी पालकांनी आपल्या मुलींसाठी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करावी. यामध्ये सोने सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही लॉकरची गरज नाही किंवा ते चोरीला जाण्याची भीतीही नाही. तसेच शेअर बाजाराप्रमाणे तेही परतावा देते, तर सोन्याच्या बाजारभावात वाढ झाली की सोन्याच्या किमतीतही वाढ होते.
Girl Child Future Investment Best Schemes
Money Fund