घोटी -इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदार संघात विकास करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, सातत्याने पाठपुरावा करून मतदार संघात विकासासाठी कामे मंजुर केली आहेत. श्रेय घेणे हे माझे उदिष्ट नसुन जनहिताची कामे करत राहणार असुन जनता सुज्ञ आहे कुणी काहीही सांगीतले तरी सत्य आहे ते लपणार नाही. आज पर्यंत ज्यांना काही करता आले नाही अशी मंडळी श्रेय लाटण्यासाठी जनतेची दिशाभूल करत असल्याची खंत आमदार हिरामण खोसकर यांनी केली. ते तालुक्यातील माणिकखांब येथे विविध विकास कामाच्या भुमिपुजन प्रसंगी बोलत होते.
इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब ग्रामपंचायत हद्दीत आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते नळपाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार, रस्ते काँक्रिटिकरण, पाणी शुद्धीकरण केंद्र, सभामंडप आदी ३० लाख रुपये मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, गोरख बोडके, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, मनसे उपजिल्हा अध्यक्ष संदीप किर्वे, प्रकाश तोकडे, ज्ञानेश्वर कडु, बाळासाहेब लंगडे, पंढरी लंगडे, तुकाराम वारघडे, गोपाळ भगत, बाबुराव भोर, दौलतराव दुभाषे, खंडु परदेशी, कमलाकर नाठे, सरपंच अंजनाबाई गोविंद चव्हाण, उपसरपंच वनिता चव्हाण, मनसेचे उप तालुकाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, ग्रा. पं. सदस्य शाम चव्हाण, अशोक पगारे, गंगाराम गांगड, सुकराज म्हसणे, पिंटू चव्हाण, शाखा प्रमुख भारत भटाटे ,सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भटाटे, सदस्य संजय भटाटे, मा.सरपंच काशिनाथ गांगड, काशिनाथ शिद, लालु आडोळे, ज्ञानेश्वर भटाटे, संतोष चव्हाण, सुनील पगारे, वसंत चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, गोकुळ चव्हाण, निवृत्ती चव्हाण, भाऊसाहेब सोनवणे, बाळकृष्ण जोशी, तुकाराम चव्हाण राजु चव्हाण, मारूती चव्हाण, हारिश्चंर आडोळे आदी उपस्थित होते.