गावात आतापर्यंत पाच ते सहा वर्षात सहा ग्रामसेवकांच्या बदल्या
घोटी – ग्रामसेवक म्हटला म्हणजे विकासाचे दुसरे नाव आहे गावात विविध विकासकामे करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे त्याचा पाठपुरावा करणे आधी बाबी त्यांच्याकडे असतात असेच काम पिंपळगाव मोर येथील ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव करत आहे. मात्र गावातील काही स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतःच्या हितासाठी नेहमीच त्यांच्या विरोधात अर्ज फाट्यावरून मानसिक त्रास देत असतात. मात्र त्यातीलच उपसरपंच यांच्यासह दोनशेहून अधिक ग्रामस्थ त्यांच्या कामाची पावती देताना दिसत आहे. त्यांची बदली होऊ नये यासाठी गावातील नागरिकांनी निवेदन देखील दिले आहे.
विशेष म्हणजे या गावात आतापर्यंत सहा महिन्यांच्या पुढे एक ही ग्रामसेवक थारा धरत नाही. केवळ काही लोकांचा मानसीक त्रास असल्यामुळे या गावात कोणी ग्रामसेवक राहत नाही. त्यामुळे गावात कोणी ग्रामसेवक देता का असे चित्र इथे बघायला मिळते. ग्रामसेवक आला तर त्याला काम न करू देणे, सतत व्यत्यय आणणे, ग्रामपंचायत मध्ये केलेल्या कामात विरोध आणणे, दलित वस्तीत प्रस्ताव सादर केले तर त्याला विरोध करणे असे प्रकार होत आहे. यावेळी ग्रामसेवक जाधव यांनी बोलताना सांगितले की माझ्याकडे पिंपळगाव मोर व भरवीर अशी दोन गावे असताना दोन्ही गावे प्रामाणिक पणे सांभाळत आहे. दोन्ही गावांचेअंतर जवळपास वीस किलोमीटर आहे. विशेष इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन ग्रामसेवक यांच्या कामात अडथळा येणार नाही असे प्रयत्न केले पाहिजे.
दोनशे ग्रामस्थांनी दिले निवेदन