घोटी – वालदेवी धरण येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या नाशिक मधील नऊ जणांपैकी एक तरुण व पाच तरुणी बुडाल्या होत्या. फोटो काढण्याच्या नादात तोल जाऊन या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजतंय रात्री खूप अंधार असल्यामुळे बचाव पथकाला १ मृतदेह काढण्यात यश आले होते. त्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली होती आज सकाळी ७.३० वाजता पोलिसांच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने लवकर शोध मोहीम हाती घेतली. त्यानंतर उर्वरित पाच मृतदेह अवघ्या अर्धा तासात काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यातील सहाच्या सहा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. सर्व मृतदेह नाशिक येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये आरती उर्फ राणी भालेराव (२४) रा. मोरवाडी, हिम्मत चौधरी (१६), नजिया वजीर (१९), खुशी वजीर (०९) ज्योती गमे व सोनी गमे (रा. सिंहस्थ नगर) अशी मृतांची नावे आहेत. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीव-हे पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यासह पोलीस हवालदार डी जी फड, मोरे, सोनवणे, गायकवाड, निंबाळकर, मराठे, भोईर, चौधरी, भगत, आंबोरे आदी घटनास्थळी उपस्थित होते.