कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने बंद चा निर्णय
घोटी – इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि परिस्थिती हाताबाहेर जात असून तालुक्यातील कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३०० च्या वर गेली आहे. याच अनुषंगाने घोटीत आढावा बैठक घोटी पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यापारी बांधवांनी सहभाग नोंदवून पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर ९ दिवसीय जनता कर्फ्यू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉस्पिटल व मेडिकल सुविधा व्यतिरिक्त संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
इगतपुरी तालुक्यातील घोटी ही व्यापारासाठी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते या ठिकाणी तालुक्यासह ठाणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येत असल्या कारणाने शहरातील गर्दी कमी होत असतांना दिसत नसल्याने तातडीने बैठक आयोजित केली होती. घोटी पोलीस ठाण्यातील आयोजित कोरणासंदर्भातील आढावा बैठकीत आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे घोटी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, ग्रामपालिका सरपंच रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, सचिन गोणके, हिरामण कडू, हरीश चव्हाण, ग्रामपालिका पदाधिकारी व व्यापारीवर्ग यांची बैठक संपन्न झाली.
त्या ठिकाणी बैठकीत आज दिनांक १७ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत ९ दिवस जनता कर्फ्यु चे म्हणजे संपूर्ण शहर कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आमदार हिरामण खोसकर, यांनी व्यापारीवर्गाला घोटी हॉटस्पॉट बनू नये म्हणून आपण उपाय योजना राबवित असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण योग्य नियोजन करून बंद ठेवल्यास साखळी तोडू शकतो असे मार्गदर्शन केले. त्यानंतर व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना तहसीलदार कासुळे, सहा.पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, सरपंच रामदास भोर यांनी मार्गदर्शन केले कोरोनाची साखळी रोखण्यासाठी विविध उपाययोजना वर चर्चा झाली.
आज पासून घोटी शहर दवाखाने व मेडिकल वगळता संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. कुणीही दुकाने उघडे ठेवल्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. घोटी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय गरजेचा असल्याने ९ दिवसीय जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी घोटी ग्रामपालिका सरपंच रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, सचिन गोणके, हिरामण कडू, प्रशांत रुपवते, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब पवार, संदीप जाधव, हरीश चव्हाण, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांच्यासह बैठकीत नियोजनामध्ये किराणा असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान गायकवाड, मिलन शहा, युवराज टाकळकर, भाजीपाला फ्रुट असोसिएशनचे विजय गोसावी, सतीश कडू, यांच्यासह व्यापारी बैठकीत उपस्थित होते.