नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल एका तरुणावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब मणियार असे या तरुणाचे नाव आहे. घोटी येथे सुधाकर नगर येथे तो राहतो.
या घटनेयावरून काही काळ घोटी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोटी पोलीस ठाण्याबाहेर यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र घोटी आणि इगतपुरी पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार न होऊ देता परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. घोटी शहरातून रूट मार्च काढत नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या आपत्तीजनक पोस्ट ठेऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
घोटी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल निलेश विलास साळवे यांच्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आक्षेपार्ह पोस्ट टाकणे या तरुणाच्या चांगलीच अंगलट आली आहे.
Ghoti Facebook Post Youth FIR