घोटी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घोटी परिसरात काल मध्यरात्री दोन ठिकाणी दरोडेखोरांनी तलवारीचे वार करुन १० तोळे सोने आणि एक लाख रुपये रक्कमेचा मुद्देमाल लंपास केला. दरोडेखोरांनी घरातील महिला आणि लहान मुलांचा कानातले सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासन मध्यरात्री पासून या ठिकाणी तळ ठोकून बसले आहे. जखमींवर घोटी व नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घडलेली घटना अशी की, तालुक्यात दरोड्याच्या दोन घटना घडल्या आहेत. घोटी परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी दोन जागी सशस्त्र दरोडा घातला या दरोड्यामध्ये घरातील महिला आणि लहान मुलांचा कानातले सोन्याचे दागिने अक्षरशः ओरबाडून नेले दरोडेखोरांना प्रतिकार करत असताना घरातील व्यक्तींवर तलवारीने वार देखील करण्यात आले आहेत. १० तोळे सोने आणि एक लाख रुपये रक्कमेचां मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत.
दुसऱ्या घटनेत याच परिसरातील एका अजून घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकून एका व्यक्तीवर तलवारीने वर करून त्याला जखमी केले या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासन मध्यरात्री पासून या ठिकाणी तळ ठोकून आहे. हाताचे ठसे घेणारे फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे तर जखमींवर घोटी व नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत