इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिवसावळ्या हत्या, चेनस्नेचिंग, दरोडेखोरीचे प्रमाण वाढले आहे. विविध शहरांमध्ये सातत्याने अशा घटना घडत असल्याचे कानावर पडत असते. अशात आता भरदिवसा कोर्ट परिसरात चेंबरमध्ये घुसून वकीलाचा खून केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक असलेल्या न्यायपालिकेतील महत्त्वाचा घटक म्हणजे वकील होय. वकीलांवर गेल्या काही वर्षांमध्ये हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वीदेखील न्यायालयाच्या परिसरातच वकीलांवर हल्ले झाले आहेत. असाच प्रकार गाझियाबाद येथे घडला आहे. अज्ञान हल्लेखोरांनी चक्क कोर्टात घुसून वकिलाची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरात आणि शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत वकील हे न्यायालयातील त्यांच्या चेंबरमध्ये बसले असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी केबिनमध्ये घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, वकिलांचा जागीच मृत्यू झाला होता. गाझियाबादच्या सिहानीगेट पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे.
येथील न्यायालयात वकील आपल्या चेंबरमध्ये बसले होते. त्याचवेळी, अज्ञात हल्लेखोरांनी वकिलांच्या चेंबरमध्ये घुसून त्यांच्या डोक्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यानंतर, ते घटनास्थळावरुन पळून गेले. या घटनेने कोर्ट परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आजुबाजूच्या लोकांकडे घटनेची चौकशी केली. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
दुपारी सव्वा २ वाजता सिहानी गेट पोलिस ठाण्यात या घटनेबाबत माहिती मिळाली. मोनू ऊर्फ मनोज चौधरी हे वकील आपल्या चेंबरमध्ये बसले होते. त्यावेळी, दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. याबाबत माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथही घटनास्थळी रवाना झाले होते. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती गाझियाबादचे डीसीपी निपुण अग्रवाल यांनी दिली.
Ghaziabaad Crime Court Advocate Murder Bullet Fired