नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर २५ नोव्हेंबर ते ९ जानेवारीपर्यंत कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाने टण्याटप्याने रस्ता वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे केळापत्रक जाहीर केले आहे. परंतु, काही लोकांनी घाटरस्ता दिवसभर पूर्णपणे बंद तसेच दोन महिने रस्ता बंद असल्याची अफवा पसरविल्याने येथील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. घाटरस्ता सुरळीत सुरू असून, भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सप्तशृंगी गडाचे सरपंच रमेश पवार यांनी केले आहे.
या अफवांमुळे देवीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. येथील लॉजिंग व्यवस्राय, पंचक्रोशीतील खेड्यापाड्यातील गावातून येणारे, फुलमाळा विकणारे, भाजीपाला विक्रेते, दुग्ध व्यवसाय अशा अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनाही या घाटरस्ता बंद असल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना २४ डिसेंबरपासून नाताळ आणि नववर्ष दरम्यान ५ जानेवारीपर्यंत रस्ता सुरू राहणार आहे.
सप्तशृंगी गड घाटरस्ता सोमवार, बुधवार व गुरुवार या तीन दिवशी सकाळी सहा ते साडेअकरापर्यंत वाहतुकीसाठी बंद तर मंगळवार, शुक्रवार, रविवार या तीन दिवशी संपूर्ण दिवस रस्ता बाहतुकीसाठी सुरू असून, या दिवशी काम बंद ठेवण्याचा निर्णय सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दर रविवार, मंगळवार, शुक्रवार पहिल्या पायरी येथे कायम भाविकांचा राबता असतो. परंतु, अफवेमुळे या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाटरस्ता सुरळीत सुरू असून, भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सप्तश्रृंगी गडावरील सरपंच रमेश पवार यांनी केले आहे._
अफवांवर विश्वास ठेवू नये.
सप्तश्रृंगी गडावरील घाटरस्ता हा दिवसभर बंद नसून, यासाही व व वार निश्चित केलेले आहेत. सोमवार, दुधवार, गुरुवार या तीन दिवस सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी रस्ता बंद तर मंगळवार, शुक्रबार, रविवार या तीन दिवस रस्ता वाहतुकीसाठी सुरु, असे कामाचे नियोजन आहे. दोन-तीन महिन घटरस्ता बंद नाही, भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
रमेश पवार, सरपंच