नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकप्रिय कवी व गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त जीवनगाणे हा संगीतमय कार्यक्रम १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृह येथे संपन्न होत आहे. पुण्यातील गायिका आणि कलांगण चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका चैत्राली अभ्यंकर हा कार्यक्रम गेली १० वर्ष सातत्याने करत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभ्यंकर यांची विशेष मुलाखत इंडिया दर्पणद्वारे प्रसिद्ध होत आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई अशा विविध शहरातून हा कार्यक्रम झाला असून रसिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नाशिककर रसिकांसमोर प्रथमच हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाच्या निधीतून विविध अनेक गरजू संस्थांना मदत करण्यात येते. या कार्यक्रमात गायक अमित दाते तसेच निवेदक हेमंत बर्वे सहभागी होणाऱ आहेत. या कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी चैत्राली अभ्यंकर यांनी इंडिया दर्पण कार्यालयला भेट दिली. यावेळी लेखिका स्मिता सैंदाणकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
बघा त्यांची ही सविस्तर मुलाखत…
GD Madgulkar Jivangane Musical Program Special Interview
Chaitrali Abhyankar