गौतम संचेती, नाशिक
नाशिक — जुन्या पिढीत लग्नाचा वाढदिवस फारसा साजरा केला जात नाही. आता तो केला तरी त्याला आधुनिक किंवा इव्हेंटची जोड देऊन तो केला जातो. पण, गावडे परिवाराची मुलगी आश्विनी गावडे- राठी यांनी आपल्या आई – बाबांचा वाढदिवस हटके पध्दतीने साजरा केला. तो विधीवत पध्दतीने गोदान देऊन…त्यामुळे या लग्नाच्या वाढदिवसाची चर्चा सर्वत्र रंगली….
नाशिक येथे व्दारका परिसरात राहणारे बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी संजय गावडे व लासलगावच्या प्रतिष्ठीत होळकर परिवारातील सदस्य भारती गावडे यांचा ४१ लग्नाचा वाढदिवस होता. तो सर्वांच्या आठवणीत रहावा व त्यातून गौसेवा व्हावी असा हेतू ठेऊन कुटुंबियांनी मखमलाबाद रोडवर जगझाप मार्गावरील इस्कॅान गौशाळेत गोदानाचा सोहळा करण्याचा निश्चय केला. त्यानंतर गुरुवारी हा सोहळा गावडे, होळकर व राठी कुटुंबियांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सुरुवातील विधीवत यज्ञ इस्कॅानचे मुकुंद रासदास, निषकिनचन स्वरुपदास यांनी केला. त्यानंतर गौपूजा करण्यात आली व नंतर गोदान करण्यात आले. विशेष म्हणजे गोदानानंतर याच ठिकाणी दोघांनी वरमाळा पुन्हा घातल्या. त्यानंतर केकही कापण्यात आला. या सोहळ्यात अजिंक्य गावडे, आश्विनी गावडे -राठी, मनिषा अजिंक्य गावडे, जावई प्रितम राठी, श्रीराज व श्रीजीत गावडे, कैलास तुपे, गोकुळ होळकर, अरुण रसाळ, मोरेश्वर निफाडे, संजय खालकर, महेश गीते , पुनम गावडे, निकीता खंगाळ यांच्यासह गावडे, होळकर, राठी परिवाराचे सदस्य उपस्थितीत होते. सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा केल्याचा आनंदही सर्वांच्या चेह-यांवर होता.
गाय दान करणे म्हणजे काय
हिंदूंमध्ये आणि वैदिक शास्त्रानुसार गाय ही पवित्र मानली जाते आणि मातेप्रमाणे त्याची पूजा केली जाते. म्हणजे गायीला गौमाता असेही म्हणतात. गोदान ही हिंदूंमध्ये अतिशय पवित्र प्रथा आहे असे मानले जाते. गोदान देतांना संपूर्ण समारंभ आयोजित केला जातो. गायीची पूजा केली जाते आणि सर्व विधी/पूजा संपल्यानंतर, गाय दान केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात.
आई -वडिलांचे स्वप्न
आई- बाबांचा लग्नाचा वाढदिवस गोदानाने करावा हे स्वप्न होते. त्यामुळे तो हटके करण्याबरोबर हिंदु परंपरेनुसार विधीवत व्हावा यासाठी गौमातेची पूजा बरोबरच गाय दान केले.
आश्विनी गावडे- राठी