ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वत:च्या आगळ्यावेगळ्या नृत्यशैलीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटील हीला आता सत्यनारायणाच्या पुजेत डान्स करायला बोलाविणे आले आहे. यापूर्वी गौतमीला बैलाच्या वाढदिवसासाठी डान्सचे आवतन आले होते. त्यानंतर आता वसई येथील खार्डी येथे चक्क सत्यनारायणाच्या पुजेत डान्ससाठी गौतमीला बोलावणे धाडले आहे. खार्डीकरांच्या या नादखुळ्याची राज्यात चर्चा आहे.
गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरण बनलं आहे. सोलापुरात तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी छतावर चढलेले लोक छत कोसळल्याने जखमी झाले होते. एका ठिकाणी ज्याच वाढदिवसासाठी डान्स शो होता, त्यालाच मारल्याचा प्रकार घडला होता. तसेच तिच्या नृत्यशैलीवरही अनेकांनी यापूर्वी टीका केली आहे.
दरम्यान सत्यनारायण पुजेमुळे पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे. वसई येथील खार्डी याठिकाणी होणाऱ्या सत्यनारायण पूजेनिमित्त एका कार्यक्रमात गौतमी पाटीलला बोलावण्यात आलं आहे. येत्या २५ तारखेला हा कार्यक्रम पार पडणार आहे. या गावात पहिल्यांदाच गौतमीचा कार्यक्रम होणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मांडवी पोलीस कर्मचाऱ्यांना याठिकाणी बंदोबस्त करावा लागणार आहे.
एका कार्यक्रमाचे मानधन
आजघडीला गौतमी पाटील ही सर्वात महागडी नृत्यांगना ठरली आहे. ती एका कार्यक्रमासाठी १ ते ३ लाखांपर्यंत मानधन घेते. तिच्या कार्यक्रमात सतत वादविवाद आणि राडे होत असतात. अनेक जण तिच्यावर टीकेची झोड उठवितात. तरीदेखील गौतमीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीचा कोणताच कार्यक्रम विचित्र घटनांशिवाय पार पडत नाही, हे विशेष.
Gautami Patil Dance Program Vasai