इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेले वर्ष आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणाने गाजले. बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान याच्या मुलाचे यात नाव आल्याने ही केस हाय प्रोफाइल झाली. त्यानंतर देशभरात याचीच चर्चा होती. आर्यन खान याचं या प्रकरणात अडकणं, त्याची तुरुंगवारी आणि त्याला यातून सोडवण्यासाठी शाहरुखने केलेले प्रयत्न या सगळ्या गोष्टी सातत्याने प्रसार माध्यमांसमोर येत होत्या. मात्र, या सगळ्यात आर्यन खानची आई गौरी खान हिने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अखेर गौरीनं या प्रकरणावरील मौन सोडले आहे. हा आमच्या आयुष्यातील अत्यंत वाईट काळ होता, असे गौरी सांगते.
‘कॉफी विथ करण’च्या नवीन एपिसोडमध्ये गौरीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणावर मौन सोडले. आर्यन, सुहाना आणि शाहरुख यांच्याबाबत तिनं ‘कॉफी विथ करण’मध्ये चर्चा केली. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण-7’ हा फारच लोकप्रिय कार्यक्रम आहे. अनेक कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावतात. या कार्यक्रमाच्या नवीन एपिसोडमध्ये गौरी खान, भावना पांडे आणि माहीप कपूर हे हजेरी लावणार आहेत.
ऑक्टोबर 2021 मध्ये आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली.
त्यानंतर आर्यन बरेच दिवस तुरुंगात होता. नंतर त्याला क्लीनचिट मिळाली. या प्रकरणावर गौरी खाननं ‘कॉफी विथ करण’मध्ये प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, या कठीण काळात अनेकांनी आम्हाला साथ दिली. जे आम्हाला ओळखतही नव्हते, त्यांनी देखील आम्हाला सदिच्छा दिल्या, धीर दिला. या सर्वांनी आम्हाला जी मदत केली, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. मात्र, आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही, अशी खंतही गौरीने व्यक्त केली.
गौरीची मुलगी सुहाना खान ही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे, तर रीमा कागती या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. काही दिवसांपूर्वी ‘कॉफी विथ करण’च्या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोमध्ये करण गौरीला प्रश्न विचारतो की, तू सुहानाला कोणती डेटिंग टिप देशील? करणच्या या प्रश्नाचं गौरी उत्तर देते, ‘कधीच एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नको.’
Gauri Khan Reaction on Aryan Khan drug Case
Entertainment Coffee with Karan
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/