अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. नवीन वाळू धोरणाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हयात वाळू उत्खनन व वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन असे निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे.
ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायर पर्यंत असणारे टिप्पर टैम्पो व इतर ) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करण्यात यावी.
वाहतुकीचा दर शासनाने निश्चीत केल्याप्रमाणे राहील याबाबतची सविस्तर माहिती www.ahmednagar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील, असे अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
Gaun Khanij Vahtuk Nondani