वॉशिंग्टन – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांचा काडीमोड झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीच्या वाटणीवरून कोणताच वाद होण्याची शक्यता नाही. कारण दोघांकडेही मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. तसेच आपल्या संपत्तीचा मोठा वाटा सामाजिक कामांसाठी देणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केलेले आहे. दोघां दरम्यान वेगळे होण्यासाठी कोणताही करार नसल्याने घटस्फोटावरून वाद निर्माण झालेला नाही.
वॉशिंग्टन येथे मेलिंडा गेट्स यांनी या आठवड्यात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. जाणकारांच्या माहितीनुसार, या प्रक्रियेत दोघांमध्ये सहमती झाली नाही किंवा आक्षेप घेतला गेला नाही. दोघांमधील काडीमोड सौहार्दाच्या वातावरणात होत असेल तर तोच करार समजावा. परंतु अशा करारांना न्यायालयात ग्राह्य धरले जात नाही. एखाद्या पक्षकाराकडे दुर्लक्ष झालेले आहे, असे न्यायालयाला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत तो ग्राह्य धरला जात नाही. संपत्ती वाटप किचकट नसल्याने अतिश्रीमंत दांपत्यांमध्ये असे करार कमीच झालेले असतात.
अब्जाधीश समाजसेवक बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी मंगळवारी घटस्फोटाची घोषणा केली होती. खूप विचार केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेत असल्याचे उभयंतांनी ट्विटरवर संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले होते. लोकांना चांगले जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याचे काम करत असलेली एक संस्था आम्ही गेल्या २७ वर्षांहून अधिक काळापासून चालवत आहोत. या मिशनमध्ये आणि संस्थेत आम्ही कामे करत राहूच परंतु दांपत्याच्या स्वरूपात आता आम्ही एकत्र राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते.