नाशिक – जेल रोड परिसरात गिझरमधून गॅस लिक झाल्यामुळे गुदमरून तरूणीचा म्रुत्यू
नाशिक – जेल रोड परिसरात गिझरमधून गॅस लिक झाल्यामुळे गुदमरून तरूणीचा म्रुत्यू झाल्याची घटना घडली आहे. साक्षी अनिल जाधव (वय २२, श्री संकूल अपार्टमेंट, जेल रोड) असे मृत युवतीचे नाव आहे. साक्षी शनिवारी सकाळी घरातील बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली होती. यावेळेस गिझरमध्ये लिकेज झाल्याने गॅस सर्वत्र पसरला. हा गॅस साक्षीच्या नाका तोंडात गेल्याने ती बेशुध्द पडली. कुटूंबियानी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. पाटील यांनी मृत घोषीत केले.
५२ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक – कुटुंबिय घराची कडी न लावता झोपी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात घूसून ५२ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना संजीवनगर भागात घडली. मुस्तकीन मुस्तफा शेख (वय २६, संजीवनगर सातपूर) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शेख कुटुंबिय काल रात्री त्यांच्या घराच्या दरवाजाला कडी लावण्यास विसरले मध्यरात्री केव्हातरी सगळे झोपेत असतांना चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरातील तिघांचे मोबाईल आणि ३० हजाराची रोकड असा सुमारे ५२ हजाराचा ऐवज चोरुन नेला. अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.