इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर संपूर्ण महिला वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. त्यामुळे सिलेंडरच्या किमती वाढल्या की, गृहीणींचे बजेट कोलमडते, असे म्हटले जाते. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती नियंत्रणात राहाव्यात, असे सर्वसामान्यांची मागणी आहे. परंतु अलिकडच्या काळात या सिलेंडरच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. यासंदर्भात सर्वसामान्यांचा रोष अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सहन करावा लागला आहे. सिलेंडरच्या किंमती कमी कराव्यात अशी मागणी करत तामिळनाडूमधील एका खेडेगावातील महिलांनी केंद्रीय अर्थमंत्री यांना चक्क घेराव घातला.
सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणजे सीतारामन या तामिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील पाज़हियसीवरम गावात पोहोचल्या होत्या. येथून त्यांनी निवडणुकीसाठी ‘वॉल टू वॉल’ प्रचाराला सुरुवात केली. तेथे अर्थमंत्री सीतारामन यांना महिलांनी घेराव घातल्याची घटना घडली, एलपीजी सिलींडर म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती जास्त असून त्या कमी कराव्यात, असेही या माहिलांनी म्हटले आहे.
गेल्या पाच ते सात वर्षात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली असून सर्वसामान्य खिशाला आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयावर बद्दल सर्व सामान्य नागरिक विशेषतः महिला वर्गामध्ये असंतोष निर्माण झालेली दिसून येते. सदर महिलांच्या या विनंतीवर अर्थमंत्र्यांनी त्यांना समाधानकारक उत्तर दिले. सिलिंडर का महाग झाला आहे आणि त्याच्या किमती नेमक्या कधी कमी होऊ शकतात हे स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय आणि अनेक घटक त्यास कारणीभूत आहेत. तरीही सरकारने फार किंमती वाढू दिलेल्या नाहीत, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
Gas Cylinder Rate Finance Minister Womens Agitation