अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील राममंदिर जवळ असलेल्या अंगणवाडी क्र.५ ला अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता शेवाळे व मदतनीस अर्चना वाघ हे लहानबालकांसाठी गॅसच्या शेगडीवर आहार शिजवत असतांना अचानक सिलेंडरने पेट घेतला. त्यावेळी अंगणवाडीत ३५ लहान बालक (वय ३ ते ६) दोन गरोदर बालकांच्या माता होत्या. सदर आग प्रचंड पेट घेत असतांना कार्यकर्ती व मदतनीस यांना प्रथमता सर्व बालकांना बाहेर काढुन आजुबाजुच्या नागरिकांना आवाज देऊन आग विझवण्यासाठी मदत मागितली. त्वरित डॅा.सुभाष आहेर व डॅा.स्वप्निल सुर्यवंशी यांच्याकडील आग विझवण्याचे सिलेंडर उपलब्ध केल्यामुळे आग आटोक्यास आणण्यास मदत झाल्याने मोठा अनर्थ टळला. शेजारीच आदिवासी मोठी लोकवस्ती देखील होती. आग आटोक्यास आणण्यासाठी सरपंच रतिलाल परदेशी, सुमित देशमुख, आनंद महाजन, डॅा.सुभाष आहेर, नागेश निकम, समाधान महाजन, ग्रामसेवक यु.बी.खैरनार सह इतर नागरिक व आजुबाजुचे अंगणवाडी सर्व कार्यकर्त्या व मदतनीस हजर होते. सदर प्रकाराची शासनाने दखल घेऊन त्वरीत अंगणवाडीत आहार शिजवणे बंद करून आधी प्रमाणेच बचत गटाकडे आहार शिजवण्यास देण्यात यावा अशी मागणी सरपंच रतिलाल परदेशी यांनी केली आहे.