नाशिक – घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर फाटा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी गॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने गॅस सिलेंडरची तिरडी काढून महिलांनी निषेध व्यक्त केला. यावेळी महिला आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत “मोदी तेरे राज मे, जनता बुरे हाल मे,” “केंद्र सरकार हाय हाय,” “मोदीजी का देखो खेल महंगा सिलेंडर, महंगा तेल”, “बहोत हुई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार ”अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांचे जेवण महागणार आहे. दरवाढीचा त्रास सर्वसामान्यची कोरोनाकाळात आर्थिक स्थिती मंदावली असतांना सरकार जीवनाश्यक वस्तूंमुळे सर्व सामान्य जनतेची गळचेपी होत आहे. त्यामुळे आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित (non-subsidised) गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.
सरकारी तेल कंपन्यांनी (government oil companies) घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये २५ रुपयांनी वाढ केली आहे. तर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या (commercial gas cylinders) दरामध्ये ६८ रुपयांनी वाढ केली आहे. १७ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना ८५९.५ रुपये मोजावे लागणार आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, गायत्री झांजरे , रुबिना खान, स्वाती मोरे, राधा जाधव, सुलताना शेख,पद्संगिता उमाप, मनिषा झांजरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.