इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात बाजारात अत्याधुनिक आणि नवनवीन प्रकारच्या स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. त्यातच तरुणाईमध्ये या स्मार्ट वॉचची खूपच क्रेझ दिसून येते. सोलर बॅटरीवर चालणाऱ्या स्मार्टवॉचला जास्त मागणी दिसून येत आहे. सदर वॉच ही पोहताना घातली जाऊ शकते आणि बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करावी लागत नाही, त्यामुळे गार्मिनचे नवीनतम स्मार्टवॉच सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. सध्या गार्मिनने त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले आहे.
विशेष बाब म्हणजे हे स्मार्टवॉच सौरऊर्जेवर चालते आणि बॅटरीचे आयुष्य जास्त असते. कंपनीचे म्हणणे आहे की, हे नवीन स्मार्टवॉच खास ग्राहकांसाठी बनविली आहे. सुप्रसिद्ध कंपनी Garmin ने आपली नवीन स्मार्टवॉच सीरिज Forerunner 955 आणि Forerunner 255 भारतात लाँच केली आहे. Forerunner 955 सीरिजमध्ये दोन स्मार्टवॉच आहेत आणि ती म्हणजे Forerunner 955 आणि Forerunner 955 Solarहोय.
त्याच वेळी, Forerunner 255 अंतर्गत, गार्मिनने Forerunner 255 आणि Forerunner 255S लाँच केले आहेत. सोलार पॉवर मॉडेलसह येणार्या Forerunner 955 सीरिजच्या सुरुवातीची किंमत 53,490 रुपये आहे. दुसरीकडे, Forerunner 255 ची सुरुवातीची किंमत 37,490 रुपये आहे.
सदर कंपनी वॉचमध्ये 360 पिक्सेल रिझॉल्युशनसह 1.3 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास डीएक्स प्रोटक्शनसोबत येतो. यामध्ये देण्यात आलेल्या फीचर्सना सहजरित्या अॅक्सेस करता यावे यासाठी कंपनीनं यात 5 बटन दिले आहेत. यात नोटिफिकेशनशिवाय म्युझिक सपोर्ट, रेस मॅट्रिक्स आणि रिअल टाईम स्टॅमिना इन्फॉर्मेशनची माहिती मिळते.
कनेक्टिव्हीटीसाठी यात गार्मिन पे, गार्मिन कनेक्ट, जीपीएस, मल्टी फ्रिक्वेन्सी पोझिशनिंग, ब्लुटूथ, एएनटी प्लस आणि वायफायसारखे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. ही जगातील पहिले सोलर चार्जिंग सपोर्ट करणारे जीपीएस स्मार्टवॉच आहे. फोररनर 255 सीरिजचे फीचर्स या सीरिजमध्ये कंपनी 260×260 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.3-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देत आहे.
या सीरिजच्या एस मॉडेलमध्ये, 1.1-इंचाचा टचस्क्रीन पाहायला मिळेल. स्मार्टवॉचमध्ये डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कंपनी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देखील देत आहे. कंपनीच्या या अत्याधुनिक स्मार्टवॉचची खासियत म्हणजे त्यांत 4 जीबी रॅमसह रेस आणि पेस प्रो विजेट, लाइव्ह ट्रॅकिंगची सुविधाही मिळते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटशिवाय, आघाडीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून स्मार्ट घड्याळे खरेदी करता येतात.