गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुर्दैवी! गरबा खेळताना युवकाचा मृत्यू, मुलाला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या पित्यानेही सोडले प्राण

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2022 | 5:50 pm
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. येथे गरबा खेळणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा धक्का वडिलांना सहन झाला नाही आणि त्यांचाही मृत्यू झाला आहे. एकाचवेळी पिता आणि पुत्र दोघांचे निधन झाल्याने कुटुंबियांवर मोठेच संकट कोसळले आहे. हे प्रकरण पालघर जिल्ह्यातील विरार शहरातील आहे. येथील गरबा कार्यक्रमात नाचताना एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

विरारच्या पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री विरारमधील ग्लोबल सिटी कॉम्प्लेक्समध्ये गरबा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी मनीष नरपाजी सोनिग्रा हा युवक गरबा खेळत होता. त्याचवेळी तो नाचत असताना खाली पडला. या युवकाला त्याचे वडील नरपजी सोनिग्रा यांनी तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून या युवकाला मृत घोषित केले. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून वडीलही कोसळले. त्यांचाही रुग्णालयातच मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गुजरातमध्येही घटना
गुजरातच्या आनंद जिल्ह्यातही गरबा खेळत असताना एका २१ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तारापुरा, आनंद येथील शिवशक्ती सोसायटीतर्फे गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वीरेंद्र सिंग रमेश भाई राजपूत असे मृत युवकाचे नाव आहे. ३० सप्टेंबर रोजी वीरेंद्र हा गरबा खेळत होता. यादरम्यान मित्र त्याचा व्हिडिओ बनवत होते. त्यानंतर अचानक वीरेंद्र बेशुद्ध होऊन खाली पडला.

सोसायटीतील तरुणांनी त्याला घाईघाईत रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच वीरेंद्रचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. व्हिडिओच्या सुरुवातीला वीरेंद्र खूपच अस्वस्थ दिसत आहे. त्यानंतर गरबा खेळताना तो जमिनीवर पडतो. वीरेंद्र राजपूतचे वडील मोरज गावातील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. वीरेंद्र हा दोन भावांमध्ये लहान होता. मुलाच्या आकस्मिक निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे.

Garba Playing Youth Death after Father Also Dead

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

सप्तशृंगीगडावर २५ हजार भाविकांनी घेतले दर्शन; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महानैवेद्य आरती

India Darpan

Next Post
IMG 20221003 WA0033 1 e1664800259544

सप्तशृंगीगडावर २५ हजार भाविकांनी घेतले दर्शन; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महानैवेद्य आरती

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011