येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला येथील कापसे फाऊंडेशनच्या अंतर्गत असलेल्या अहिल्या गोशाळेत सुमारे ३०० गीर गाईंचे संगोपन केले जाते. दुध व दुग्धजन्य पदार्थांची निमित्ती येथे करण्यात येते. गो शाळेच्या वंदना कापसे यांच्या संकल्पनेतून येथे काम करणा-या मुक बधिर मुलांनी टाकाऊ शेणापासून आकर्षक विविध स्वरुपाच्या इको फ्रेंडली गणेश मुर्तींची निर्मिती करत प्रत्येक मुर्तीला साजेशी रंगसंगती केल्याने या मुर्तींना एक आगळे-वेगळे पण आले आहे. शेणापासून बनविलेल्या या मुर्ती पाण्यात काही वेळातच विरघळून जात असल्याने प्रर्दुषण व निसर्गाची हानी होत नसल्याने या मुर्तींना बाजारात मागणी वाढली आहे.