शनिवार, सप्टेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप… राज्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत

by Gautam Sancheti
सप्टेंबर 7, 2025 | 6:13 am
in मुख्य बातमी
0
GANESH VISRJAN 4 1024x682 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला.

राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित साटम, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमितकुमार सैनी तसेच हजारो भाविक यांची उपस्थिती होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात वातावरण भारावून गेले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला.

राज्यात दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “लोकांनी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. बाप्पाच्या विसर्जनावेळी मनात थोडीशी खंत व दु:ख होते, कारण दहा दिवसांनी बाप्पा आपल्याला सोडून जातात. पण याचबरोबर पुढच्या वर्षी ते परत येणार आहेत याचा आनंदही असतो,” असे श्री.फडणवीस म्हणाले.

मुंबई, पुणे तसेच राज्यातील सर्व शहरांमध्ये, गावांमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत व शिस्तीत पार पडल्या. “पोलीस विभाग, महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे हा उत्सव सुरळीत पार पडला. त्यांचे काम कौतुकास्पद आहे,” असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळ्याला मुंबईकरांसोबत विविध मान्यवरांचीही उपस्थिती होती. मुंबई महानगरपालिका, पोलिस व स्वयंसेवकांच्या मदतीने विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी वाहने जपून चालवावी, जाणून घ्या, रविवार, ७ सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

fir111
क्राईम डायरी

कार खरेदी विक्रीत अशी केली आर्थिक फसवणूक…गुन्हा दाखल

सप्टेंबर 27, 2025
crime1
क्राईम डायरी

ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवकास जीवंत जाळण्याचा प्रयत्न… अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव केल्याचा राग

सप्टेंबर 27, 2025
Untitled 42
संमिश्र वार्ता

राज्यात या आठ जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

सप्टेंबर 27, 2025
IMG 20250927 WA0309 1
संमिश्र वार्ता

बीएसएनएलच्या स्वदेशी 4जी सेवेचे लोकार्पण…. राज्य शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळणार

सप्टेंबर 27, 2025
IMG 20250927 WA0322 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 27, 2025
Untitled 41
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील फार्मसीच्या ८९ संस्थावर पीसीआयची मोठी कारवाई…प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून केले बाहेर

सप्टेंबर 27, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१५ लाखाची लाच घेणा-या मुख्य आयकर आयुक्त आणि आयटीओ यांना ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 27, 2025
post
संमिश्र वार्ता

टपाल विभागाने स्पीड पोस्टच्या दरात केले बदल…ही आहे नवीन वैशिष्ट्ये

सप्टेंबर 27, 2025
Next Post
WhatsApp Image 2025 09 06 at 6.39.57 PM 1024x682 1

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011