नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गणेशोत्सवानिमित्त अनेक गणेश मंडळ स्थापने अगोदरच वाजत गाजत मिरवणूक काढून गणेशाची मुर्ती मंडळाच्या मंडपात नेत आहे. रविवारी नाशिकच्या शिवप्रतिष्ठा मित्र मंडळातर्फे काठे गल्लीचा विघ्नहर्ताची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक काठे गल्ली सिंग्नल ते बनकर चौक, त्रिकोणी गार्डण, श्री स्वामी समर्थ केंद्र, वनराज सोसायटी या मार्गावरुन निघाली.
ढोल ताश्यांचे गजरात वाजत निघालेल्या या मिरवणूकीत भाजपचे नेते सुनील बागुल, सचिन मराठे, बाळासाहेब पाठक, चंद्रकात थोरात, मिलिंद भालेराव शिवसेनेचे विशाल पवार हे नेते सामील झाले. या मिरवणूकीचे संयोजन नकुल राजपूत, अक्षद मराठे, अपूर्व साळी, हर्ष कांबळे, पार्थ पाराशरे, मानस पाटील, जित संघवी, कलश संघवी, आरुष पोकळे, किरण पेठे, शुभम जोशी यांनी केले. या मिरवणूकीत गोल्डन मॅन तेजस जाधव यांनी हजेरी लावली.