इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरात गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला असला तरी सध्या एका गणपती लाडूची मोठी चर्चा होत आहे. तेलंगणातील हैदराबाद येथील गणेश पंडालमध्ये गणपतीला अर्पण केलेल्या लाडूचा ४५ लाख रुपयांना लिलाव करण्यात आला आहे. १२ किलो लाडूंच्या लिलावात एवढे पैसे पाहून लोक थक्क झाले. एवढेच नाही तर या लिलावाने विक्रमही केला आहे.
ही घटना हैद्राबाद येथील मरकथा श्री लक्ष्मी गणपती उत्सव मंडळाची आहे. वृत्तानुसार, या लाडूचा लिलाव ४४ लाख ९९ हजार ९९९ रुपयांना झाला आहे. योगायोगाने याच लाडूचा एक दिवस आधी २४ लाख ६० लाख रुपयांना लिलाव झाला होता. मात्र आता या १२ किलोच्या लाडूचा जवळपास दुप्पट किमतीत लिलाव करण्यात आला आहे. अहवालानुसार, लाडूंच्या लिलावात एवढी किंमत यापूर्वी कधीच मिळाली नव्हती, असा विक्रम या लिलावाने झाला.
केवळ हैदराबाद आणि सिकंदराबादमध्येच नव्हे, तर तेलगू राज्यांमध्ये लाडूंसाठी सर्वाधिक बोली यापूर्वी कधीच लागली नव्हती. गोल्डन लाडू या नावाने प्रसिद्ध असलेल्या या लाडूचा लिलाव आधी वेंगेटी लक्ष्मा रेड्डी यांनी जिंकला होता पण दुसऱ्या दिवशी किंमत वाढली. यानंतर दुसऱ्या दिवशी कनाजीगुडा मरकटाचा हा लाडू गीताप्रिया आणि व्यंकट राव यांनी ४५ लाख ९९ हजार ९९९ रुपयांना विकत घेतला. दरवर्षी बाळापूरच्या लाडूंचा असा लिलाव होतो. लाडूंचा लिलाव करण्याची परंपरा १९९४ पासून सुरू आहे. लिलावातून मिळालेली रक्कम बाळापूरमधील मंदिरांच्या विकासासाठी वापरली जात असल्याचे सांगितले जात आहे.
Ganpati 12KG Laddu Auction Record
Telangana Hyderabad