सोलापूर – तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (वय ९५) यांचे सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. अश्विनी हॉस्पिटल येथे ते उपचार घेत होते. विधानसभेचे विद्यापीठ अशी त्यांची ओळख होती. त्यांना आबा म्हणूनच सर्व हाक मारत. कोणतेही अधिवेशन असले तरी ते एसटीने प्रवास करत असे. त्याच्या या साधेपणामुळे त्यांना राजकारणात वेगळा मान होता. १९६२ ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सलग ५५ वर्षे आमदार होते. १९७८ व १९९९ ते मंत्रीही होते. विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याने २०१२ मध्ये त्यांचा गौरवही करण्यात आला होता. २०१९ ला त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यानंतर नातू डॉ. अनिकेत देशमुख याने या मतदारसंघात निवडणूक लढवली. पण, या निवडणुकीत डॅा. अनिकेतचा पराभव झाला.