अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरात पुन्हा एकदा गॅँगवारचा थरार पहावयास मिळाला. शहरा बाहेरुन जात असलेल्या आग्रा महामार्गावरील लब्बाईक हॉटेल जवळ मोहम्मद सिद्दीकी या तरुणावर प्रतिस्पर्धी गँगच्या टोळीने हल्ला चढवत त्याच्यावर लाठी काठ्या, तीक्ष्ण हत्यारांनी डोक्यावर,पाठीवर,पोटावर, पायावर वार करत मारहाण केली. या मारहाणीत पायाला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्याला ताबडतोब शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे मोहम्मद याच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. हा हल्ला दोन नंबरच्या धंद्यातून झाल्याची बोलले जात असून पवारवाडी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.