नाशिक – बांधकाम व्यावसायिकाला धमकी देत गोळीबार केल्या प्रकरणी गॅगस्टर रवी पुजारी याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. गुरुवारी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात रवी पुजारी याला सशस्त्र पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात होते. याच प्रकरणात अगोदर ६ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
पाथर्डी फाटा येथील बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटीची खंडणी पुजारी यांनी मागीतली होती. त्यात गोळीबारही करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी नाशिक येथे सुरु आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने तपास पूर्ण झाल्याचे सांगितले. यावेळी पुजारी यांच्या फोन कॅालचा आवाज तपासण्यासाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते तज्ञांकडे पाठवल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात सराकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर पुजारी यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्याचे आदेश देण्यात आले.