नाशिक – बोट क्लब येथे होणारे सर्व जलक्रीडा प्रकारांमध्ये अजून वाढ होण्यासाठी विविध जलक्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी बोट क्लब गंगापूर धरण येथील जलक्रीडा प्रकार पाहणीच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
गंगापूर धरण येथील बोट क्लबला राज्याचे क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाचे जलक्रीडाचे महाव्यवस्थापक सारंग कुलकर्णी, क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाचे उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, नाशिक जिल्हा रोईंग़ संघटनेचे प्रा. हेमंत पाटील, श्री.तांबे आणि खेळाडू उपस्थित होते.
बोट क्लब पाहणीपूर्वी क्रीडामंत्री श्री. केदारे यांनी शासकिय विश्राम गृह येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांनी ऑलिम्पिक दिनानिमित्त तयार केलेल्या मास्कचे अनावरण केले. पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलातील विविध सुविधांची पाहणी केली सिंथेटिक ट्रॅक इतर सुविधांची पाहणी करुन त्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच एनसीसी करता या ठिकाणी कार्यालय उपलब्ध करून द्यावे अशी सूचना करुन टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये सहभागी होणा-या सर्व भारतातील आणि महाराष्ट्रातील खेळाडूंना क्रीडामंत्री श्री.केदार यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिव छत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड यांनी श्री शिवाजी महाराज क्रीडा संकुल या जिल्हा क्रीडा संकुलास जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.