नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगा विलास क्रूझने आपली पहिली जलयात्रा दिब्रुगड येथे पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; “एक खास प्रवास पूर्ण झाला ! मला आशा आहे की गंगा विलास क्रूझ प्रवासात भारत आणि परदेशातील अधिक पर्यटक सहभागी होतील.”
या क्रूझचा प्रवास १३ जानेवारी रोजी वाराणसीपासून सुरू झाला. त्यानंतर ही क्रूझ १ मार्च रोजी दिब्रुगडला पोहचली आहे. वाराणसीतील गंगा नदीवर प्रसिद्ध गंगा आरती करून ही क्रूझ आपल्या प्रवासाला निघाली होती. लग्झरी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या क्रूझमध्ये १८ आलिशान खोल्या आहेत. गंगा विलास हे क्रूझ भारतात तयार करण्यात आलेले आहे. या क्रूझने भारत आणि बांगलादेशाच्या एकू्ण २७ नद्यांच्या पात्रात प्रवास केला. ५० हून अधिक ठिकाणी ही यात्रा थांबली. हा रोमांचक प्रवास ५१ दिवसाचा होता. या क्रूझने ३२०० किलोमीटरचा प्रवास केला. त्यातून स्विस नागरीकांनी काशी ते असममधील डिब्रुगढ दरम्यान प्रवास केला.
https://twitter.com/narendramodi/status/1630773024353026048?s=20