नवी दिल्ली – सेवाभावी वृत्तीने मानवतेचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते जसे या समाजात आहेत, तसेच या उलट पशूवर वृत्तीने वागत, मानवतेला कलंक असणारे काही गुन्हेगार देखील आहेत. आणि त्याच्या लहान मुलांची खरेदी-विक्री करतात. अशा या लज्जास्पद आणि भयानक घटनेमुळे सध्या दिल्ली शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अशी टोळी अनेक राज्यात पसरलेली असून यासंदर्भात पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे गरीब आणि असहाय पालकांना आमिष दाखवून त्यांची मुले विकत घेणाऱ्या मानवी तस्करी टोळीचा गुन्हे शाखेने नुकताच पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन नवजात बालकेही सापडली आहेत. ही टोळी गरजूंना दोन ते तीन लाख रुपयांना विकायची. आतापर्यंत आरोपींनी ५० हून अधिक बाळांची विक्री केली आहे. मुले विकत घेतलेल्या १० जणांची ओळख पटली आहे. टोळीचा म्होरक्या फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, प्रिया जैन (२६, रा. साहिबाद ), प्रिया ( रा. मंगोलपुरी, दिल्ली ) काजल (रा. पटेल नगर ), रेखा उर्फ अंजली ( रा.शाहदरा ), शिवानी (३८, रा. विश्वास नगर.) प्रेमवती (रा. गुरुग्राम ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. नवजात बालकांची तस्करी करणारी टोळी गांधी नगर स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यानंतर टीमने सुमारास प्रिया जैन, प्रिया आणि काजल यांना तिथून पकडले. त्यांच्याकडून सात-आठ दिवसांचे नवजात अर्भक जप्त करण्यात आले. गरीब गर्भवती महिलांचा शोध घेत आहे.
काजल आणि प्रियंका या दोघी गरीब वस्त्यांमध्ये जाऊन येथे कोणत्या महिला गर्भवती आहेत हे शोधत असत. अशा स्त्रिया आणि त्यांच्या पतींना त्यांची मुले विकायला लावत. त्या पालकांना बदल्यात एक ते दीड लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर स्वत: किंवा दलालामार्फत नवजात अर्भक दोन ते तीन लाख रुपयांना विकले जाई, प्राथमिक तपासात ५० हून अधिक मुलांची विक्री झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासा दरम्यान या तिन्ही महिला नवजात अर्भक विकण्यासाठी गांधी नगरमध्ये पोहोचल्याचे निष्पन्न झाले. या तिघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी नवजात अर्भकासह अन्य तीन महिलांना पकडले. हे तिघेही दलालामार्फत मुलाचा व्यवहार करणार होते. पोलिसांच्या चौकशीत या महिलांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या लोकांनी सांगितले की, प्रियांका आणि काजल त्यांच्या गँग लीडर आहेत. मात्र सध्या प्रियांका फरार आहे.
पोलीस चौकशीत आरोपी महिलांनी सांगितले की, सर्व बालके गरीब कुटुंबातील आहेत. काही वेळापूर्वी तिला समजले की IVF सेंटरमध्ये गर्भधारणेसाठी अंडी विकली जातात. ज्या महिलांना नेहमीच्या पद्धतीने मुले होत नाहीत, त्यांची IVF च्या मदतीने मुलांची निर्मिती केली जाते. अशाच काही गरजू महिलांना या महिला आपली स्पर्म विकतात. त्या बदल्यात त्यांना सुमारे २५ हजार रुपये मिळतात. काजल गरीब महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये घेऊन कमिशनवर स्पर्म विकायची. येथे काही जण मुले दत्तक घेत असत, परंतु लांबलचक कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांना ते घेणे शक्य होत नव्हते. काजल आणि प्रियंका अशा जोडप्याला मूल मिळवून देत आणि त्यातही भरघोस कमिशन घेत असल्याचे आढळले.