बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गणेशोत्सव विशेष… तुज नमो… टिटवाळ्याचा महागणपती… अशी आहे त्याची महती…

सप्टेंबर 26, 2023 | 5:21 am
in इतर
0
Titwala Ganesh Mandir 1

गणेशोत्सव विशेष…
तुज नमो…
टिटवाळ्याचा महागणपती…
अशी आहे त्याची महती…

आज आपण अशा गणपतीची माहिती घेणार आहोत ज्याचे दर्शन घेतले की तरुण-तरुणींचे विवाह जमतात. विवाह विनायक नावाने प्रसिद्ध असलेला हा महागणपती मुंबई जवळील टिटवाळा गावात आहे. गणपतीचे हे मंदिर सिद्धीविनायक महागणपती नावाने देखील प्रसिद्ध आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण-कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेले हे मंदिर अतीप्राचीन आहे. याचे मूळ या मंदिराचा संबंध पौराणिक काळातील दुष्यंत शकुंतलेशी जोडलेला आहे. पुराणकाळातील ही गोष्ट आहे. दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला आणि राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. उत्साहाने पती गृही गेलेली नवीन शकुंतला त्यामुळे आल्या पावली परत फिरली. राजा दुष्यन्ताला शकुंतलेची विस्मृती झाल्यानंतर कण्व मुनींनी या गणेशाची स्थापना करून शकुंतलेला याची उपासना करण्यास सांगितले. शकुंतलेने त्याप्रमाणे उपासना केल्यानंतर ती दुर्वास ऋषींच्या शापातून मुक्त झाली. राजा दुष्यंतला तिची आठवण झाली आणि शकुंतला-दुष्यंतचे पुन्हा मीलन झाले, अशी आख्यायिका सांगतात. शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती.

महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध आहे, याच परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथेच वाढली. त्यामुळेही या ठिकाणाला एक प्राचिन महत्त्व आहे. टिटवाळा हे छोटेसे गाव मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. टिटवाळा स्टेशनवर उतरले की, मंदिरात जाण्यासाठी रिक्षा मिळतात. पण आश्चर्य म्हणजे इथल्या रस्त्यावर अजूनही टांगे धावतात. टप.. टप.. आवाज करत धावणार्‍या टांग्यांमध्ये बसून मंदिरापर्यंत जायला लहान-मोठे सगळ्यांनाच आवडते.

गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. चतुर्थी, मंगळवार या दिवसांशिवाय एरवी फारशी गर्दी नसल्यामुळे रांगेत ताटकळत उभे रहावे लागत नाही. आपण थेट गाभार्‍यात पोहचतो. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेते. रेखीव चेहरा, पुढे आलेली सोंड यामुळे मूर्तीला एक ठसठसीतपणा आला आहे. सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील या मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत.

मूर्तीला रोज नेटकेपणाने पितांबर नेसवला जातो. डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मूर्तीवर चांदीचेच छत्र आहे. इथे फुलांची सुरेख आरस केलेली असते. सध्या मोगर्‍याचे दिवस असल्यामुळे मोगर्‍याचे हार छताला बांधले जातात. त्याचा मंद वास संपूर्ण गाभार्‍यात दरवळत असतो. ही गणपतीची मूर्ती गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून आपली नजर खिळवून ठेवते. त्यामुळे आपण आजूबाजूला बघण्याचेच विसरुन जातो.

काही वेळाने लक्ष जाते ते देवघराकडे. जेथे गणपतीची मूर्ती आहे तो संपूर्ण देव्हारा चांदीचा बारीक कलाकुसर केलेला आहे. चांदीच्या देवार्‍यात असलेली केशरी मूर्ती आणि हिरव्या दुर्वा, पांढरी मोगर्‍याची व जास्वंदाची फुले यामुळे सुरेख रंगसंगती साधली जाते. बघणार्‍याची नजर फिरवून ठेवते. गाभारा आणि सभा मंडपामध्ये जाळी लावून वेगळे केले आहे. गाभार्‍याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या दाराने बाहेर पडून आपण सभा मंडपात पोहचतो. इथे स्वरबद्ध गणपती, अर्थवशीर्षाची आवर्तनं सुरू असतात.

सत्य विनायक, गणेश याग इत्यादी भक्तांनी बांधलेल्या पूजा सुरू असतात. त्यांचा एकत्रित ऐकू येणारा नाद मनाला शांती देऊन जातो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून ते सभा मंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे सतत दर्शन आपल्याला होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दिपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. हा एकंदर परिसरच खूप रमणीय आहे. आंबा, करवंद, जांभळे असला रानमेवा बघून भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटते.

सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण-कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेले हे देऊळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे. हे देऊळ एका सरोवरात बांधलेले होते. कालौघात यात गाळ साचून देऊळ पूर्णपणे गाडले गेले व सरोवरही नाममात्र राहिले. माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन करुन घेतले. त्यादरम्यान हे देउळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान केले. मूर्तीची पुनर्स्थापना केली. त्याचवेळी देवळासमोर लाकडी सभामंडप बांधला. १९९५-९६मध्ये या सभामंडपाचे पुनर्नवीकरण केले गेले. या मंदिराला छत्रपती शिवाजी आणि माधवराव पेशवे यांनी भेट दिल्याचेही सांगतात.

येथे पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली, असे सांगितले जाते आणि म्हणूनच या महागणपतीस विवाह विनायक असे म्हटले जाते. श्री महागणपती टिटवाळा गणपती इच्छापूर्ती गणेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातही, याच्या आशीर्वादाने इच्छुक वर–वधू प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. म्हणून या गणपतीच्या भक्तांमध्ये तरुण-तरुणींची संख्या जास्त आहे! हे देवस्थान ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात आहे. मंदिर तेजस (काळू) नदीच्या काठावर आहे. साडेतीन फूट उंचीची मूर्ती शेंदूराने माखलेली आहे. डोळे व नाभी सेफ्टीक मण्यांनी मढवलेली आहे. मूर्तीच्या चरणाशी यक्ष-गंधर्व, डाव्या–उजव्या बाजूला रिद्धी–सिद्धी आहेत. मूर्ती डाव्या सोंडेची आहे. सभामंडपात चांदीचा उंदीर आहे. या उंदराच्या कानात भक्त इच्छा सांगतात. शनिवार, रविवार आणि मंगळवारी तसेच संकष्टी चतुर्थीला मंदिरात उत्सव असतो.

कसे जावे
कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर टिटवळा रेल्वे स्टेशन आहे. तसेच, रस्ते मार्गेही येथे जाता येते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ही आहे भारतातली पहिली महिला कोट्याधीश गायिका… तिची फी भल्याभल्यांना परवडायची नाही… जाणून घ्या तिच्याविषयी…

Next Post

अष्टविनायक… ओझरचा श्री विघ्नेश्वर… अशी आहे पौराणिक कथा… बघा व्हिडिओ…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर… बघा, कोणते प्रभाग झाले राखीव…

नोव्हेंबर 11, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

नगरपालिका निवडणुकीचा धुराळा सुरू असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे मोठे निर्णय…

नोव्हेंबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
Next Post
FGm51JmVgAIkbWp

अष्टविनायक... ओझरचा श्री विघ्नेश्वर... अशी आहे पौराणिक कथा... बघा व्हिडिओ...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011