शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गणेशोत्सव विशेष… तुज नमो… कोल्हापुरातील अष्टविनायक

सप्टेंबर 18, 2023 | 5:24 am
in इतर
0
20210913 193105

कोल्हापुरातील अष्टविनायक

करवीर किंवा कोल्हापूर हे प्राचीन शहर आहे. तसा उल्लेख करवीर माहात्म्य, देवी भागवत या ग्रंथातून सापडतो. अशा या करवीर नगरीतील विघ्नहर्त्यांची अनेक स्थाने ही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. विशेष म्हणजे कोल्हापुरात देखील अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवानिमित्त आज आपण कोल्हापूरमधील गणेशांचे दर्शन घेऊया. कोल्हापुरातील प्राचीन अष्टविनायकांचा विचार करताना सर्व प्रथम आठवतो तो इंचनाळचा गणपती त्याचप्रमाणे बिनखांबी गणपतीचे स्थान पटकन नजरेसमोर येते. त्याबरोबरच गणेशवाडीचा गणपती, शिलाहारांचा गणपती, साक्षी विनायक, ओढ्यावरचा सिद्धिविनायक गणपती, गारेचा गणेश, महालक्ष्मी मंदिरातील गणपती या गणेशस्थानांनीही शंभरी ओलांडली आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

स्वयंभू श्री गणेश मंदिर, इंचनाळ
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ या गावी. या गावामध्ये स्वयंभू श्री गणेशाचे सुंदर मंदिर आहे. गडहिंग्लज तालुक्याच्या पश्चिमेस साधारणतः सहा ते सात किलोमीटर अंतरावर इंचनाळ हे गाव आहे. येथे असलेल्या श्री गणेश मंदिरामुळे या गावाची प्रसिद्धी पंचक्रोशीत झाली आहे. गणेश पंचायतन पद्धतीतील हे स्वयंभू श्री गणेश मंदिर येथे आहे. कर्नाटक राज्यातून आणलेला दगडांपासून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंदिराला ओळखले जाते. या गणेशाचे नाव गणेश कोशातही गणले गेले आहे. गणेश मूर्तीच्या चारी बाजूस विष्णू, शंकर, सूर्यदेव आणि आदिमाया यांच्या मुर्त्या आहेत. समोरील बाजूस सुंदर असा मूषकराज विराजमान आहे. गोपाळ अप्पाजी कुलकर्णी यांनी इ. स. 1907 ते 1908 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

करवीर चे परम पूज्य स्वामी श्री शंकराचार्य यांच्या हस्ते 1992 रोजी या मंदिराचे कलशारोहन करण्यात आले. सूर्यनारायणाची किरणे थेट मूर्तीवर पडतील अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिराचे कोरीव काम पाहून मन थक्क होऊन जाते. मंदिराच्या खांबांची रचना अप्रतिम आहे. या मंदिराच्या लालटबिंबावर गणेशाची सुंदर मूर्ती आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच कासवाचे दर्शन होते. मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेली श्री गणेशाची मूर्ती काळ्या दगडी पाषाणामध्ये कोरण्यात आली असून ही बैठी व शांत आहे. गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून उजव्या हातात पाश आणि वरदहस्त, डाव्या हातात अंकुश आणि वाटी आहे.

समर्थांनी गणेशस्तवनामध्ये गणेशाचे फार सुंदर वर्णन केले आहे.
समर्थ म्हणतात, लवथवित मलपे दोंद वेष्टित कट्ट नागबंद।।
अगदी याच वर्णनाप्रमाणे या गणरायाच्या कमरेभोवती नागाचा वेटोळा पाहायला मिळतो. मंदिराच्या बाहेरील आवारात एक छोटेसे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात मध्ये असलेल्या नारळाच्या झाडांमुळे आपण जणू काही कोकणातच आलो आहोत असे वाटते. या मंदिरामध्ये अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. दसरा आणि दिवाळीला श्रींची मिरवणूक पालखी निघते. या पालखीला गावकरीच नव्हे तर पंचक्रोशीतील भक्त येतात. विशेषतः अंगारकी संकष्टीला या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी उसळते.

बिनखांबी जोशीराव गणपती
कोल्हापुरातील प्राचीन गणेशस्थानांचा विचार करताना बिनखांबी गणपतीचे स्थान पटकन नजरेसमोर येते. हाच बिनखांबी गणपती, जोशीराव गणपती म्हणूनही ओळखला जातो. आजच्या पिढीस जोशीराव हे कोण सांगायला हवं. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याची व्यवस्था नीट असावयास हवी म्हणून अष्टप्रधानांची योजना केली. त्याच वेळी कोंकणातले हे जोशीराव घराणे देशावर आले. शिवरायांच्या राज्यात त्यांच्यावरही साताऱ्यातील काही कामांची जबाबदारी सोपविली गेली. पुढे शिवरायांच्या मृत्यूनंतर साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी असे राज्याचे दोन भाग झाले. ताराबाई राणीसाहेबांनी कोल्हापूरच्या गादी स्थापनेवेळी धर्मकृत्याचे योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी जोशीरावांना आपल्या बरोबर आणले.

जोशीराव घराण्याचे आराध्य दैवत म्हणूनच त्यांची गणेश स्थाने करवीर नगरीत आली. बिनखांबी गणपती त्यापैकीच एक. त्याचा इतिहास तितकाच रंजक आहे. सध्या ज्या ठिकाणी हे मंदिर आहे, त्या ठिकाणी जोशीराव वाडा होता. त्याचे काही अवशेषच आता शिल्लक आहेत. येथे त्यांची गणपतीची मूर्ती होती. पुढे जवळील देवळासाठी काही भक्तांनी जोशीरावांचेकडे मूर्ती मागितली आणि जोशीरावांनी घरातील मूर्ती देवालयासाठी दिली. पुढे तिचेच नामकरण जोशीराव गणपती झाले. त्याचबरोबर हा गणपती बिनखांबी गणपती या नावाने परिचित आहे.

सदरचे मंदिर वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिरास एकही खांब नाही. या मंदिराचे खरे कसब सभा मंडपाच्या छताच्या बांधकामामध्ये आहे. या छताच्या मध्यभागी जो की-स्टोन किंवा वास्तुविशारदांच्या भाषेत सांगायचे तर आयकॉन आहे, त्या आधारे देवळाच्या छताचे बांधकाम झाले आहे. कोल्हापुरातील अनेक पुरातन वास्तू अशाच प्रकारे की-स्टोनवर आधारित आहे. देवळांतील मूर्ती चतुर्भुज असून ती डाव्या सोंडेची आहे. देवळाचा गाभारा प्रशस्त असून मूर्ती प्रसन्न आहे.

गणेशवाडीचा गणपती
गणेशवाडी हे स्थान शिरोळा तालुक्यात असून हा गणपती पटवर्धन घराण्याचे कुलदैवत आहे. गणेशवाडीचे मूळ नाव कागवाड, मात्र पटवर्धनांनी या गावी गणेशमूर्तीची स्थापना केल्यावर कागवाडचे गणेशवाडी झाले. विनायकाची एकूण ५६ स्थाने आहेत. त्यापैकी गणेशवाडी हे एक स्थान मानले जाते. सांगली, बुधगाव, मिरज, कुरुंदवाड, जमखंडी या संस्थानचे अधिपती पटवर्धन या गणपतीच्या दर्शनासाठी येत. कृष्णा नदीचे काठावर हे देऊळ आहे. येथील मूर्ती पाषाणाची असून देवालयाची रचना हेमाडपंथी आहे.

शिलाहारांचा गणपती
शिलाहार राजांची राजधानी असलेले, प्राचीनत्व सिद्ध करणारे बीड हे गाव याच करवीर परिसरातील गाव. शिलाहार राजा गंडादित्य यांच्या काळांत या देवालयाचे बांधकाम झाले. शिलाहार राजांची कुलदेवता श्रीमहालक्ष्मी असली तरी ते परमभक्त गणपतीचे होते. शिलाहार राजांनी आपल्या कार्यकालात गणेशाच्या नावाने सोन्याचे नाणे चलनात आणले होते. या देवलयांतील गणेशाची मूर्ती चार फूट रुंद अडीच फूट जाड सहा फूट उंच आहे. मूर्ती चतुर्भुज डाव्या सोंडेची रेखीव प्रसन्न असून बीडेश्वराच्या देवालयाच्या बाहेर छोटय़ाशा स्वतंत्र देवालयांत स्थापना केली आहे.

साक्षी गणेश
हे स्थान महालक्ष्मी मंदिरात आहे. महालक्ष्मी दर्शनानंतर प्रदक्षिणा घालताना मंदिराच्या डाव्या बाजूस श्रीमहालक्ष्मी मंदिराभोवती असलेल्या ज्या मूर्ती आपले लक्ष वेधून घेतात, त्यापैकीच एक हा साक्षी विनायक. ही गणेशाची मूर्ती उभी आहे. करवीर महात्म्यांत या मूर्तीविषयी माहिती मिळते. अगस्ती मुनी व लोपामुद्रा यांनी करवीर नगरीची जी यात्रा केली ती या गणपतीस साक्षी ठेवून केली असे मानले जाते. आजही महालक्ष्मी मंदिराच्या प्रदक्षिणेची सुरुवात आणि अखेर या मूर्ती दर्शनानेच होते.

ओढय़ावरचा सिद्धिविनायक गणपती
कोल्हापुरातील ओढय़ावरचा गणपती हे गणेशभक्तांचे आणखी एक श्रद्धास्थान. या ओढय़ास जिंतीचा किंवा जयंती ओढा असे म्हणतात. ही जयंती छोटीशी नदी होती, असा उल्लेख करवीर महात्म्यांत आहे. या जयंती नदीच्या काठावर जोशीरावांनी देवालयाची स्थापना केली. जोशीरावांच्या पूर्वजांचे तपाचे हे ठिकाण होते असे सांगितले जाते. या मंदिरातील पूर्वाभिमुख मूर्ती बैठी असून ती प्रसन्न तसंच रेखीव आहे. कोल्हापूरच्या सीमेवरील गणपती म्हणून प्राचीन काळात या स्थानाचे महत्त्व होते, असे सांगितले जाते. या गणपतीच्या दर्शनाने करवीर नगरीची प्रदक्षिणा पुरी होते, असे मानले जाते.

गारेचा गणपती
महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस हे देवालय आहे. तिथे असलेली पांढरी शुभ्र गारेची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. अनेक भाविक या गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून दोन फूट उंचीची आहे. तिच्या चार हातांपैकी उजवा हात खाली झुकला असून त्यात जपाची माळ आहे. डाव्या हातात पात्र आहे. वरच्या डाव्या हातात परशु तर वरच्या उजव्या हातात आयुध आहे. पोटावर नाग आहे. त्याच्या दोन्ही बाजूस ऋद्धी सिद्धी आहेत. लंबोदर हे नाव या मूर्तीस सार्थ ठरते.

महालक्ष्मी मंदिरातील गणपती
महालक्ष्मी मंदिरात प्रवेश केल्यावर उजवीकडे छोटेसे काळ्या पाषाणाचे नक्षीदार व कोरीव मंदिर आहे. त्यात गणपतीची बैठी मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना शिलाहार राजाने केली. दोन फूट उंचीची ही डाव्या सोंडेची मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. तिचा उजवा हात मांडीवर असून डाव्या हातांत मोदक आहे. मागील दोन हातांत परशु व पाश आहेत.
याशिवाय कळंबा गावानजीक वडाच्या झाडांत स्वयंभू गणपतीचे आकार निर्माण झाले आहेत. त्या झाडास वडाचा गणपती म्हटले जाते. याशिवाय शंभर वर्षांची परंपरा असलेले पुठ्ठय़ापासून बनविलेली गणपती मूर्ती असलेले चंद्रकांत गणेश मंदिर कोल्हापूरकरांचे आराध्य दैवत होते. कालांतराने हे मंदिर बंद झाले. मूळ मालकांनी ही गणपती मूर्ती शिवाजी पेठेतील बँकेला देणगीदाखल दिली. रंकाळ्याजवळ झाडांखाली असलेला जावळाचा गणपतीही प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीस टोप नाही. म्हणून त्यांस जावळाचा गणपती म्हणतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनो, तातडीने हे करा अन्यथा…

Next Post

सेबीचा सात कंपन्यांना दणका… तळवलकरसह या कंपन्यांचा समावेश….

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
sebi

सेबीचा सात कंपन्यांना दणका... तळवलकरसह या कंपन्यांचा समावेश....

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011