गणेशोत्सवानिमित्त विशेष लेखमाला – नाशिकच्या ऐतिहासिक गणपतींची महती
प्राचीन काळापासून नाशिक हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभूरामचंद्राचा सहवास मिळाल्याने पावन झालेले हे नगर. भगवान शंकरांचे निवासस्थान असणारे त्र्यंबकेश्वर देखील हाकेच्या अंतरावर आहे. गंगेनंतरची देशातली सर्वांत लांब आणि पवित्र असलेल्या गोदावरीच्या तिरावर वसलेले नाशिक. असंख्य मंदिरांची रेलचेल असलेल्या नाशिकमध्ये गणपतीची अनेक मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे तर ऐतिहासिक आहेत.

मो. ९४२२७६५२२७
नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यातील गणपतींचा इतिहास, त्यांची महती, त्यांची अनोखी अख्यायिका, मंदिराची वैशिष्ट्ये, कलाकुसर, तेथील प्रथा-परंपरा आदींचा उलगडा करणारी विशेष लेखमाला इंडिया दर्पणने गणेश भक्तांच्या भेटीला आणली आहे. यंदा ‘इंडिया दर्पण’ मधून नाशिकच्या काही सुप्रसिद्ध गणपती मंदिरांची माहिती सादर करीत आहोत. या विशेष लेखमालेचे लेखन ज्येष्ठ लेखक विजय गोळेसर हे करीत आहेत. गणेशोत्सवाचे दहाही दिवस दररोज एका गणेशाची महती उलगडली जाणार आहे. हे गणेश विचार पुष्प आपल्या सर्वांना नक्की आवडेल, अशी खात्री आहे. पहिल्या भागात आपण पेशवेकालिन ऐतिहासिक नवश्या गणपतीची महती जाणून घेणार आहोत.
आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा
गणाधीश आपणा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, हीच प्रार्थना
– टीम इंडिया दर्पण
Ganeshotsav Special Article Series Historic Ganesh of Nashik
Vijay Golesar Ganesh Festival Ganapati Bappa