गुरूवार, नोव्हेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर… पत्र वाचून भक्तांच्या अडचणी निवारण करणारे… त्रिनेत्र गणेश!

सप्टेंबर 18, 2023 | 5:12 am
in इतर
0
Ranathambor Ganesh

गणेशोत्सव विशेष
– देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर –
पत्र वाचून भक्तांच्या अडचणी निवारण करणारे
रणथंबोरचे त्रिनेत्र गणेश!

लेखाचे शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे १०० टक्के खरं आहे. राजस्थानातील सवाई माधोपुर जिल्ह्यात रणथंबोर किल्ल्यात त्रिनेत्र गणेश मंदिर आहे. येथील गणेशाला दररोज दहा ते पंधरा किलो वजनाची पोस्ट कार्ड येतात. पुजारी प्रत्येक पत्र श्री गणेशाला वाचून दाखवितो.आणि या पत्र लिहिनार्या भाविकाच्या समस्या वा अडचणी दूर होतात असा अनुभव आहे. फार वर्षांपूर्वी दूरदर्शन वर ‘ऐसा भी होता है’ नावाच्या कार्यक्रमात रणथंबोर किल्ल्यातील हे गणेश मंदिर पाहिल्याचे आठवते. ज्यांच्यावर राजस्थानसह देशातील इतर भागातील भाविकांची अतूट श्रद्धा आहे. असे त्रिनेत्र गणेश मंदिर राजस्थानात रणथंबोर किल्ल्यात आहे.

vijay golesar
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७

त्रिनेत्र गणेश मंदिर राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि अरवली डोंगराच्या मधोमध वसलेले आहे, देश-विदेशातील लोकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र असलेला त्रिनेत्र गणेश रणथंबोर किल्ल्यात आहे.देश-विदेशातील भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात, हजारो वर्षे जुने हे मंदिर राजा हमीर देव यांनी बांधले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी हजारो भाविक त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनासाठी मंदिरात येतात.

त्रिनेत्र गणेश मंदिराचा इतिहास –
रणथंबोरचा राजा हमीरदेव चौहान याचे दिल्लीचा शासक अलाउद्दीन खिलजीशी युद्ध सुरु होते. युद्ध बराच काळ चालल्यामुळे राजा हमीर देव याला आवश्यक असलेल्या गोष्टी हळूहळू संपत होत्या, म्हणून राजा हमीर देव यांनी भगवान गणेशाला आळवले अल्लाउद्दीन खिलजीसोबतचे त्यांचे युद्ध लवकर संपुष्टात यावे आणि त्यांच्या राज्यात कसलीही कमतरता भासू नये. अशी इच्छा केली.
त्याच रात्री गणपती राजा हमीर देव यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी आश्वासन दिले की युद्ध लवकरच संपेल आणि त्याच रात्री रणथंबोर किल्ल्याच्या भिंतीवर गणेशजींची तीन डोळ्यांची मूर्तीची स्थापना केली गेली. युद्ध संपल्यानंतर लगेचच राजा हमीर देव याने विंध्याचल आणि अरावलीच्या टेकड्यांमध्ये गणेशाची मूर्ती स्थापित केली आणि 1579 फूट उंच असलेल्या मंदिराचे बांधकाम केले.
जगातील हे एकमेव मंदिर आहे जिथे तीन डोळ्यांची गणेशाची मूर्ती आहे. त्रिनेत्र गणेश मंदिरात गणेशजींची पत्नी रिद्धी-सिद्धी आणि त्यांची मुलं शुभ-लाभ यांचीही मूर्ती आहे. तसेच या मंदिरात गणेशजींचे वाहन असलेले मूषकराज देखील आहे.

भक्तांची पत्रे ऐकणारा गणेश
रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात दररोज 10 ते 15 किलो पत्रे येतात, ज्यामध्ये लग्न, नोकरी, पदोन्नती आणि भरती तसेच घरातील इतर समस्यांवरून कर्ज घेण्याबाबत लिहिलेले असते. असे म्हणतात की त्रिनेत्र गणपती आपल्या भाविकांच्या सर्व समस्या ऐकतात आणि त्या समस्या दूर करतात. म्हणून भाविक त्यांना पत्र पाठवून आपल्या समस्या सांगतात.
बहुतेक लोक हे पत्र गणेशजींच्या मंदिरात पोस्ट ऑफिसमधून पाठवतात आणि दररोज 10 ते 15 किलो पत्र येतात. भाविकांची ही पत्र दररोज एक पोस्टमन 5 किमीची चढण चढून गणेश मंदिरा पर्यंत पोहोचतो. पोस्टमनने पत्र मंदिरात पोहोचवल्यानंतर, ती सर्व पत्रे पुजारी वाचून गणेशजींना ऐकवतात. प्राचीन काळापासून अशी आख्यायिका आहे की असे केल्याने घरातील सर्व संकटे दूर होतात.

त्रिनेत्र गणेश मंदिराचा पिन कोड –
रणथंबोर किल्ल्यामध्ये स्थापन केलेल्या त्रिनेत्र गणेश मंदिराचा पिन कोड 322021 आहे, जेणेकरून भाविकांना त्यांची पत्रे पोस्ट ऑफिसद्वारे सहजपणे त्रिनेत्र गणेश मंदिरात पोहोचवता येतील.
त्रिनेत्र गणेश मंदिरात कसे जायचे?
त्रिनेत्र गणेश मंदिर सवाई माधोपूर जिल्ह्यात आहे, जे देशाच्या इतर भागातून ट्रेन आणि बसने पोहोचणे अगदी सोपे आहे.
विमानाने- रणथंबोर येथील त्रिनेत्र गणेश मंदिरासाठी सर्वात जवळचे विमानतळ जयपूरमध्ये आहे, जयपूर विमानतळावरून तुम्ही बस किंवा ट्रेनने सवाई माधोपूरला पोहोचू शकता आणि तिथून तुम्हाला त्रिनेत्र गणेश मंदिरात जाण्यासाठी टैक्सीची सुविधा उपलब्ध आहे. जिथून मंदिरात सहज पोहोचू शकता.
रेल्वेने-सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सवाई माधोपूर आहे, जिथे तुम्ही देशातील प्रमुख शहरांमधून ट्रेनने आणि तेथून कॅबने त्रिनेत्र गणेश मंदिरापर्यंत पोहोचू शकता.
बसने-सर्वात जवळचे बसस्थानक सवाई माधोपूर आहे, जिथे राजस्थानच्या इतर भागातून येण्यासाठी नियमित बसेस धावतात.

देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिरं-१ (क्रमश:)
संकलन व प्रस्तुती -विजय गोळेसर
मोबाईल-९४२२७६५२२७

Ganeshotsav Festival Ranathambore Trinetra Ganesh by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पडणार, पडणार… पण, नक्की कुठे आणि केव्हा… असा आहे पावसाचा अंदाज…

Next Post

तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस… पती सतत पत्नीला टोमणे मारायचा… हायकोर्ट म्हणाले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
mumbai high court

तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस... पती सतत पत्नीला टोमणे मारायचा... हायकोर्ट म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011